Urvashi Rautela: अवघ्या काही मिनिटांच्या आयटम साँगसाठी उर्वशीनं घेतले 'एवढे' मानधन; ‘बॉस पार्टी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती
उवर्शी ही काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटामधील बॉस पार्टी या आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
![Urvashi Rautela: अवघ्या काही मिनिटांच्या आयटम साँगसाठी उर्वशीनं घेतले 'एवढे' मानधन; ‘बॉस पार्टी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती Urvashi Rautela charged 2 crores for waltair veerayya song boss party Urvashi Rautela: अवघ्या काही मिनिटांच्या आयटम साँगसाठी उर्वशीनं घेतले 'एवढे' मानधन; ‘बॉस पार्टी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/bb47b6cb1418cb8234ef834fb16662a51674709211232259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Urvashi Rautela: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. उर्वशी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. उर्वशीच्या ग्लॅमरस स्टाईलला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. उवर्शी ही काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटामधील बॉस पार्टी या आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या आयटम साँगला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. बॉस पार्टी या आयटम साँगसाठी उर्वशीनं किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात उर्वशीनं घेतलेल्या मानधनाबाबत....
उर्वशी ही केवळ बॉलिवूडच नाही तर तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम करते. उर्वशीनं गेल्या वर्षी तिच्या तमिळ चित्रपटाची घोषणा केली होती. ती जेडी जेरीच्या द लीजेंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता उर्वशीनं साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांच्या 'वॉलटेर वीरय्या' चित्रपटातील बॉस पार्टी या आयटम साँगमध्ये काम केलं. या गाण्यासाठी तिनं दोन कोटी एवढं मानधन घेतलं. 'वॉलटेर वीरय्या' मध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रकाश राज यांच्यापेक्षा जास्त मानधन उर्वशीनं बॉस पार्टी या तीन मिनिटांच्या आयटम साँगसाठी घेतलं. प्रकाश राज यांनी या चित्रपटासाठी केवळ दीड कोटी मानधन घेतलं आहे.
View this post on Instagram
'वॉलटेर वीरय्या' हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. के.एस. रवींद्र यांनी 'वॉलटेर वीरय्या' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटातील चिरंजीवी यांच्या अॅक्शन, स्टाईल आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात चिरंजीवी यांच्यासोबतच रवी तेजा, प्रकाश राज, श्रुती हासन आणि कॅथरीन ट्रसा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
उर्वशीचे चित्रपट
'दिल है ग्रे' या चित्रपटामधून उर्वशी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उर्वशीनं बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)