Urfi Javed : उर्फी जावेद पोहोचली सुवर्ण मंदिरात; संस्कारी लूकने वेधलं लक्ष; पाहा फोटो
Urfi Javed : अटकेच्या प्रकरणानंतर उर्फी जावेद अमृतसरला गेली असून सुवर्ण मंदिराचं तिने दर्शन घेतलं आहे.
Urfi Javed at Golden Temple : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या हटके, अतरंगी फॅशनने उर्फी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता अटकेच्या प्रकरणानंतर उर्फी जावेद अमृतसरला गेली आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचं तिने दर्शन घेतलं आहे.
उर्फी जावेद पोहोचली सुवर्ण मंदिरात
उर्फी जावेद सुवर्ण मंदिरात पोहोचली आहे. तिने सोशल मीडियावर सुवर्ण मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील उर्फीच्या संस्कारी लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उर्फीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सुवर्ण मंदिरात तिने भजन कीर्तनदेखील ऐकलं आहे. तसेच प्रसादाचा फोटोही तिने शेअर केला आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेद तिची धाकटी बहीण डॉली जावेदसोबत सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेली होती. सुवर्ण मंदिरातील फोटो शेअर करत उर्फीने लिहिलं आहे,"वाहेगुरू". सुवर्ण मंदिर परिसरातील उर्फीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोवर अरे भावा हे काय पाहतोय मी, तू असे कपडेदेखील परिधान करतेस का?, ही उर्फी जावेदच आहे की दुसरं कोणी? अशा मजेदार कमेंट्स चाहते करत आहेत".
उर्फीला मिळालेली जीवे मारण्याची धमकी
उर्फी जावेदला दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. उर्फीने 'भूल भुलैया' सिनेमातील राजपाल यादवसारख्या पंडिताचा गेटअप करत एक व्हिडीओ शेअर केला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने उर्फी जावेदला ईमेलच्या माध्यमातून धमकी दिली. व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले आणि तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर उर्फीने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या... (Who Is Urfi Javed)
आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे. 'मेरी दुर्गा' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये उर्फीने काम केलं आहे. पण करण जोहरच्या (Karan Johar) 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमामुळे उर्फीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे.
संबंधित बातम्या