(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Urfi Javed: 'चित्रा वाघ, तुमच्या पक्षातील....'; दिल्लीमधील घटनेतील पीडितेच्या आईचा व्हिडीओ उर्फीनं केला शेअर
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन उर्फी जावेदनं (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या अभिनेत्री उर्फी जावेदच्या (Urfi Javed) फॅशन स्टाईलवर टीका करत आहेत. 'हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.' असं म्हणतं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. 'उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा' अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फीनं शेअर केला व्हिडीओ:
दिल्लीतमध्ये काही दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना घडली. एका तरूणीच्या गाडीला एका कारनं धडक दिली. त्यानंतर त्यामुलीला कारनं फरफटत नेले आहे. या अपघातात तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधील या प्रकरणातील पिडीतेच्या आईचा एक व्हिडीओ उर्फीनं तिच्या इन्साग्रामवर शेअर केला. या व्हिडीओला उर्फीनं कॅप्शन दिलं, 'पोलीस या घटनेला अपघात प्रकरण मानत होते. ते लोक त्या मुलीला 12 किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊ गेले, तिची हाडे मोडली होती, ती नग्न अवस्थेत होती. चित्रा वाघ, यामधील एक आरोपी हा तुमच्या पक्षातील आहे, मला तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायला आवडेल!'
चित्रा वाघ यांनी घेतली होती मुंबई पोलीस आयुक्तांची भेट
चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट शेअर होते. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं, 'मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.'
चित्रा वाघ यांच्या ट्वीटला उर्फीनं दिला होता रिप्लाय:
'तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतीचा शिकार होतात. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' असं ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं. या ट्वीटला उर्फीनं रिप्लाय दिला, 'तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?' उर्फीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: