एक्स्प्लोर
Advertisement
ओमी कलानींची हातात तलवार घेऊन स्टेजवर एन्ट्री
उल्हासनगर : नुकतीच भाजपशी युती केलेले पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी भर सभेत तलवार दाखवून स्टेजवर एन्ट्री केली. उल्हासनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेत हा प्रकार घडला.
विशेष म्हणजे या सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता आणि त्यांच्या डोळ्यात हा प्रकार घडला. या सभेत ओमी कलानींनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून, हातात भली मोठी तलवार घेऊन सभेच्या ठिकाणी आगमन केलं.
निवडणूक काळात परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांना आपल्याकडील शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही पोलिसांसमोर उल्हासनगरमध्ये कायद्याची पायमल्ली करण्यात आली.
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला झटका, कलानी-भाजप-रिपाइं युती
भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजप आणि कलानीपुत्राच्या गटात युती झाली. रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच तलवार घेऊनच स्टेजवर दाखल झाले. दरम्यान, 21 फेब्रुवारीला उल्हासनगर महापालिकेसाठी मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. शिवसेना स्वबळावर लढणार असून भाजपला कलानी आणि रिपाइंची ताकद मिळणार आहे. या युतीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हं आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement