(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉलिवूडला अलविदा करत संसार थाटला, गरोदर राहिली...; जॉन अब्राहमच्या सिनेमातील 'त्या' अभिनेत्रीला आज ओळखणंही कठीण
Udita Goswami : एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री उदिता गोस्वामी आज मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे.
Udita Goswami : बॉलिवूडने (Bollywood) अल्पावधीतच अनेक चांगल्या कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. एका सिनेमामुळे अनेक कलाकार रातोरात सुपरस्टार झाले आहेत. अभिनेत्री उदिता गोस्वामीचाही (Udita Goswami) यात समावेश आहे. एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आज मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे.
उदिता गोस्वामीने 2003 मध्ये जॉन अब्राहमच्या (John Abraham) 'पाप' (Paap) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. सौंदर्याच्या जोरावर उदिताला अल्पावधीतच चांगलच यश मिळालं. 'पाप'नंतर उदिताचा 'जहर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'जहर'लादेखील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण नंतर तिने एका सिनेनिर्मात्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने सिनेसृष्टीपासून दूर राहणं पसंत केलं.
लग्नानंतर उदिताने सोडली मनोरंजनसृष्टी?
उदिता 2005 मध्ये 'जहर' या सिनेमाचं शूटिंग करत होती. त्यावेळी तिची भेट सिनेनिर्माता मोहित सूरी यांच्यासोबत झाली. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 'जहर' हा मोहितचादेखील पहिला सिनेमा होता. पहिल्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच तो नायिकेच्या प्रेमात पडला. उदिता आणि मोहित तब्बल नऊ वर्षे एकमेकांना डेट करत होते. पुढे 2013 मध्ये त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. देवी आणि कर्मा अशी उदिता-मोहितला दोन मुलं आहेत. उदिता 2012 मध्ये शेवटची सिनेमात दिसली. त्यानंतर तिने लग्न केलं आणि बॉलिवूडला अलविदा केलं.
उदिता आज काय करते?
उदिताने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर केलं असलं तरी वैयक्तिक आयुष्य मात्र ती चांगलं जगत आहे. अभिनयापासून दूर असली तरी डीजे या प्रोफेशनमुळे देशभरात ती लोकप्रिय आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमांना प्रेक्षकांची उत्तम दाद मिळते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती चांगली कमाईदेखील करते.
View this post on Instagram
उदिता इंस्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपली शानदार लाईफस्टाईल, कुटुंब आणि मित्रपरिवारासोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. फिटनेसच्या बाबतीत ती आजही बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. उदिताने पुन्हा मनोरंजनसृष्टीत पदार्पण करावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करू शकते. लवकरच यासंदर्भात नवी अपडेट समोर येईल.
संबंधित बातम्या