Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी लाखो रुपये घेऊनही कार्यक्रमाला गैरहजर? गंभीर आरोपांवर अभिनेत्री तृप्ती डिमरीची प्रतिक्रिया
Tripti Dimri Controversy : अभिनेत्री तृप्ती डिमरीवर कार्यक्रमासाठी पैसे घेतल्याचा आणि कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचा आरोप आहे. हे सर्व आरोप निराधार असल्याचं तृप्ती डिमरीच्या टीमने म्हटलं आहे.
Tripti Dimri Event Controversy : 'ॲनिमल' चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरी राजकुमार रावसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. ॲनिमल चित्रपटापासून 'भाभी' तृप्ती डिमरी चर्चेत असते, आता पुन्हा एकदा तिच्यावर झालेल्या आरोपांमुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीवर कार्यक्रमासाठी पैसे घेतल्याचा आणि कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचा आरोप आहे. आता तृप्ती डिमरीच्या टीमने सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
लाखो रुपये घेऊन तृप्ती डिमरी कार्यक्रमाला गैरहजर?
अभिनेत्री तृप्ती डिमरीबाबत (Tripti Dimri) मोठी बातमी समोर आली आहे. पैसे घेतल्यानंतर एका कार्यक्रमात न पोहोचल्याचा आरोप अभिनेत्री तृप्ती डिमरीवर करण्यात आला आहे, त्यामुळे कार्यक्रमात बराच गोंधळ झाला आहे. तृप्ती कार्यक्रमात न पोहोचल्याने महिलांनी तिच्या पोस्टरला काळं फासलं. तृप्ती डिमरीने फी घेऊन कार्यक्रमाला हजेरी न लावल्याचा आरोप जयपूरच्या इव्हेंट आयोजकांनी केला आहे. याबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत असून त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.
View this post on Instagram
चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी
रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी सोमवारी संध्याकाळी जयपूरमध्ये FICCI FLO च्या नारी शक्ती कार्यक्रमात सहभागी होणार होत्या, असं सांगितलं जात होतं. पण, काही कारणास्तव तृप्ती इव्हेंटमध्ये आली नाही आणि मग लोक भडकले. या कार्यक्रमाशी संबंधित लोक तिच्या आगामी 'विक्की विद्या का वो वाल व्हिडीओ' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. या कार्यक्रमाशी संबंधित लोकांनी म्हटलं आहे की, अभिनेत्री तृप्ती डिमरीने या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी 5.5 लाख रुपये घेतले आहेत. यानंतर आता इव्हेंच आयोजक भिनेत्री तृप्ती डिमरीवर गुन्हा दाखल करणार आहेत. मात्र,,अभिनेत्री तृप्ती डिमरीने हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. तिच्या टीमने तसं अधिकृत निवेदन जारी केलं आहे.
तृप्ती डिमरीच्या टीमचं अधिकृत निवेदन
तृप्ती डिमरीच्या टीमने अधिकृत निवेदनात लिहिलं की, तृप्ती डिमरी सध्या विकी आणि विद्याच्या वो वाला व्हिडिओच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. ती सध्या प्रत्येक कार्यक्रमाचा भाग बनत आहे. तो कोणत्याही वचनबद्धतेपासून दूर गेला नाही. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही वैयक्तिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे कोणतेही वचन दिलेले नाही. आम्हाला स्पष्ट करायचे आहे की तृप्ती डिमरी यांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा पेमेंट घेतलेले नाही.
गंभीर आरोपांवर अभिनेत्री तृप्ती डिमरीची प्रतिक्रिया
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :