Rakhi Sawant : राखी सावंतने केलं ट्रॅफिक जाम, वाहतूक पोलिसांनी कापलं चलान! पाहा व्हिडीओ...
Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. नुकताच ड्रामा क्वीनने थेट रस्त्यावर ड्रामा केला आहे.
Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. नुकताच ड्रामा क्वीनने थेट रस्त्यावर ड्रामा केला आहे. तिच्या या ड्रामामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले होती. अखेर आता वाहतूक पोलिसांनी राखीच्या नावे चलान जारी केले आहे. राखी सावंतने जे कृत्य केले, ते पाहून लोक तिच्यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. राखीने तिची कार रस्त्याच्या मधोमध थांबवली, त्यानंतर तिच्या मागे वाहनांची रांगच रांग लागली होती. राखीच्या या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये राखी सावंत गाडी गर्दीच्या रस्त्यावर गाडी मधोमध लावून, गाडीतून उतरून काहीतरी खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाताना दिसत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जेव्हा ती पुन्हा तिच्या कारपर्यंत पोहोचते, तेव्हा ऑटो आणि इतर वाहनांची लांबलचक रांग तिच्या गाडी मागे लागलेली दिसते. यातही राखी गाडीजवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते की, ‘जिथे मी उभी राहते, तिथून लाईन सुरू होते.’
पाहा व्हिडीओ :
रस्त्याच्या मधोमध उभी असलेली राखीची कार आणि त्यामुळे झालेले ट्रॅफिक जाम नेटिझन्सना आवडले नाही, त्यामुळे ते तिला खूप ट्रोल करत आहेत. अनेक युजर्स राखी सावंतला 'नाटकी' म्हणत आहेत. अनेक युजर्सनी मुंबई पोलिसांना टॅग करत राखीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. अशाप्रकारे रस्ता अडवून ठेवल्याने अनेकांची गैरसोय झाली होती. यामुळे लोक राखीवर संतापले आहेत.
पोलिसांनी केली कारवाई
मीडिया रिपोर्टनुसार, ओशिवरा ट्रॅफिक पोलिसांनी अंधेरी येथे रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या राखीच्या कारवर ई-चलन जारी केले आहे. अभिनेत्री-मॉडेल राखी सावंतने गर्दीच्या रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
राखी सावंत सतत काहीना काही ड्रामा करत असते, ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. नुकतेच राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिना देलावरी हिने दोघांमधील नाते खोटे म्हटले होते. तसेच, हे सर्व केवळ फुटेजसाठी केले जात असल्याचे म्हटले होते. मात्र, यानंतर राखीने या गोष्टी फेटाळून लावत आदिलसोबत तिच्या लग्नाची घोषणाही केली आहे.
हेही वाचा :
Rakhi Sawant Home Tour Video : राखी सावंतचा आलिशान महाल! ‘ड्रामा क्वीन’चं दुबई स्थित घर पाहिलंत का?