(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'विक्रम वेधा' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!
लेखक-दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'विक्रम वेधा' चित्रपटाचा ट्रेलर आज (8 सप्टेंबर) कलाकारांच्या हस्ते मुंबईतील विशेष कार्यक्रमात लाँच करण्यात आला.
थँक गॉडमधील अजयचा लूक रिलीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अजय त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आता लवकरच त्याचा थँक गॉड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील अजयचा लूक रिलीज करण्यात आला आहे. अजयनं सोशल मीडियावर थँक गॉड चित्रपटातील त्याच्या लूकचा फोटो शेअर करुन या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे.
'विक्रम वेधा'च्या ट्रेलरचे पाच तासात पाच मिलियन व्ह्यूज
बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरला पाच तासाच पाच मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
'राडा' सिनेमाचा ट्रेलर आऊट
फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर हवा करण्यास सज्ज झाला आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर आणि सिनेमातील एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
हंसल मेहताच्या 'लुटेरे'चा टीझर आऊट
सिनेनिर्माता हंसल मेहताची 'लुटेरे' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा टीझर आऊट करण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अनेक विषयांवर भाष्य करण्यात आलं आहे. 'लुटेरे' ही वेबसीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
लोकेश गुप्तेच्या आगामी 'अश्वत्थ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
'अश्वत्थ' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता लोकेश गुप्ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आजपासून पुण्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
सहकुटुंब आनंद घेता येणारा 'आपडी-थापडी'
श्रेयस तळपदेने मराठी मनोरंजनक्षेत्रासह बॉलिवूडमध्येदेखील आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे लवकरच 'आपडी थापडी' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महेश मांजरेकरांनी शेअर केला बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो
महेश मांजरेकरांनी प्रोमो शेअर करत लिहिलं आहे,"मी करणार आहे बिग बॉस मराठीची सगळ्यात मोठी घोषणा". प्रोमोमध्ये महेश मांजरेकरांचे तीन धमाकेदार लुक दिसत आहेत. मांजरेकरांनी पहिल्या लुकमध्ये सदरा आणि जॅकेट घातलं आहे. तर दुसऱ्या लुकमध्ये तोडांत शिट्टी पकडली असून त्यांचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या लुकमध्ये ते पोस्टमनच्या लुकमध्ये दिसत आहेत.
चंदन प्रभाकरनं सोडला 'कपिल शर्मा शो'
कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सीझनमध्ये जुन्य सीझनमधील काही कलाकार आहेत, तर काही नव्या कलाकारांची एन्ट्री देखील या सीझनमध्ये होणार आहे. नव्या सीझनमध्ये अभिनेता कृष्णा अभिषेक सहभागी होणार नाही. आता अभिनेता चंदन प्रभाकरनं देखील हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चंदननं हा शो सोडण्याच्या निर्णयामागील कारणं देखील सांगितलं आहे.
सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी कर्लिस हॉटेल सील
भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता सोनाली फोगाट हत्याप्रकरणाबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे. त्यांनी मीडियासोबत संवाद साधताना सांगितलं की, कर्लिस रेस्टॉरंट सील करण्यात आले आहे. कर्लिस या रेस्टॉरंटमध्येच सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनाली फोगटला ड्रग्जचा ओव्हरडोज दिला.