एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर उलगडणार सई ताम्हणकरच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल सहभागी होणार आहेत. 

'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन'च्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात

सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि आमिर खान चर्चेत आहेत. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षयचा 'रक्षा बंधन'  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमांच्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात झाली आहे. 

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'धर्मवीर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 

ब्रेकअपनंतर राकेश-शमिताचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट ब्रेकअपमुळे सध्या चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीमुळे शमिता आणि राकेश चर्चेत आले होते. आता ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'तेरे विच रब दिसदा' असे या गाण्याचे नाव आहे. 

‘रक्षा बंधन’च्या प्रमोशनसाठी आलेल्या अक्षय कुमारलाही आवरला नाही मिसळ चाखण्याचा मोह!

 बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार सध्या अनेक शहरांत दौरे करत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाची टीम पुण्यात आली होती. प्रमोशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अक्षय कुमारने चक्क पुण्यातील एका हॉटेलमध्ये मिसळ पाववर ताव मारला होता. अक्षय कुमारचा मिसळ चाखतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी ‘मिस वर्ल्ड’ हरनाज कौर संधू अडचणीत

माजी ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज कौर संधूविरुद्ध चंदीगड जिल्हा न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री उपासना सिंह हिने हरनाजविरोधात दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपासन सिंह हिने गुरुवारी वकिलांमार्फत ही केस दाखल केली आहे. उपासनाने हरनाजवर आरोप करताना म्हटले की, ती एका चित्रपटाची निर्मिती करत होती, ज्यामध्ये हरनाजने काम करण्यास होकार दिला होता. यानंतर, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ती प्रमोशनसाठी कधीही आली नाही आणि आता तिने फोन उचलणे देखील बंद केले आहे. तिच्याकडे हरनाजविरोधात काही पुरावे देखील आहेत. आता न्यायालयाकडून हरनाजला समन्स बजावण्यात येणार आहे.

राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिलला मिळाली जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. आता नुकताच राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपला बॉयफ्रेंड आदिल याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे म्हटले आहे. या कथित धमक्या आदिलला बिष्णोई टोळीकडून मिळत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. 'ड्रामा क्वीन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने फोनमधील ही धमकी दाखवली आहे. मात्र, राखीने बिष्णोई गँगला कडक ताकीद देत आदिल खानपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर शेअर केले सुजलेल्या पायाचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच ‘आई’ होणार आहे. सोनम सध्या तिच्या गर्भारपणाचा आनंद घेत आहे आणि ती अनेकदा तिच्या आई होण्याच्या या प्रवासाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते. मात्र, ज्याप्रकारे प्रत्येक महिलेला गरोदरपणात काही किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागते, त्याच पद्धतीने अभिनेत्रीलाही गरोदरपणात काही बदल जाणवत आहेत. आज अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर सुजलेल्या पायांचा फोटो शेअर केला आहे.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या विवाहाचा शूभमुहूर्त ठरला असून सप्टेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू असून लग्न मुंबईत किंवा दिल्लीत होणार आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने हे कपल विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. 

अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. निर्माते दिपक राणे यांनी आपल्या या सिनेमातून कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीला मराठी सिनेमात लाँच केले आहे.  मेघा शेट्टी ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. ट्रायबल रायडींग आणि दिलपसंद या सिनेमातही मेघाने काम केले आहे. कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणून मेघाचे नाव घेतले जाते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget