एक्स्प्लोर
अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चा ट्रेलर रिलीज
![अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चा ट्रेलर रिलीज Toilet Ek Prem Katha Trailer Released Latest Updates अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चा ट्रेलर रिलीज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12114627/Trailer-580x341.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सामाजिक मुद्द्यावर आधारित ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या अक्षय कुमारच्या सिनेमाचा ट्रलेर रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमारने प्रमोशनची अनोख कल्पना आखत हा ट्रेलर फेसबुकद्वारे प्रत्येक चाहत्याला मेसेजद्वारे पाठवला आहे.
अक्षय कुमारने चाहत्यांना फेसबुकद्वारे मेसेज करण्याचं आवाहन केलं होतं. मेसेज केल्यानंतर तातडीने सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना वैयक्तीक मेसेज करुन पाठवण्यात आला. त्यामुळे अक्षय कुमारच्या चाहत्यांना ट्रेलर यूट्यूबवर येण्याअगोदरच पाहायला मिळाला.
घरामध्ये शौचायलय का गरजेचं आहे, हा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुपम खेरही या सिनेमात दिसतील.
दरम्यान सिनेमाचा ट्रेलर चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातील इनिंग ब्रेक दरम्यान रिलीज करण्यात आला. हा महत्वपूर्ण सामना पाहता यावा, यासाठी अक्षय कुमारने ट्रेलर इनिंग ब्रेकमध्ये रिलीज केला.
पाहा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)