एक्स्प्लोर
'टॉयलेट एक प्रेम कथा'ची दुसऱ्या दिवशी कमाई किती?
या सिनेमाने शनिवारी 17.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमाने पहिल्या दिवशी सरासरी कमाई केली. मात्र शनिवारी म्हणजे रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगला गल्ला जमवला.
या सिनेमाने शनिवारी 17.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
'टॉयलेट एक प्रेम कथा' भारतात 3 हजार आणि वर्ल्डवाईड 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. याच प्रकारे कमाई झाल्यास या वीकेंडपर्यंत सिनेमाची एकूण कमाई 50 कोटींपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचा सिनेमाला फायदा होणार आहे.
टॉयलेट एक प्रेम कथा हा सामाजिक विषयावरील सिनेमा आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
संबंधित बातमी : 'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement