एक्स्प्लोर
'पीके'ला मागे टाकून सलमानचा 'टायगर...' तिसऱ्या स्थानी
सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बाहुबली 2 (510 कोटी) पहिल्या स्थानावर आहे, तर आमीरचाच दंगल (374.53 कोटी) दुसऱ्या क्रमांकावर आहे
मुंबई : सुपरस्टार सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चित्रपट प्रदर्शित होऊन सहा आठवडे उलटले असले, तरी बॉक्स ऑफिसवर सिनेमाची दमदार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत सर्वाधिक कमाई (Top India Nett Grosser All Time Movie) करणाऱ्या बॉलिवूडपटांच्या यादीत 'टायगर...' तिसऱ्या स्थानी झेप घेणार असून आमीरच्या 'पीके' चित्रपटाला मागे टाकणार आहे.
'टायगर जिंदा है' चित्रपटाने भारतात 336.51 कोटी रुपयांची कमाई केली आहे. काही दिवसांतच हा सिनेमा 'पीके'ला धोबीपछाड करेल, असा अंदाज चित्रपट अभ्यासक वर्तवत आहेत. 337.72 कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या 'पीके'ला 'टायगर' लवकरच टायगर मागे टाकणार आहे.
'टायगर..'ने पहिल्या आठवड्यात 206 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 85.41 कोटी, तिसऱ्यात 27.34 कोटी, चौथ्यात 10.87 कोटी तर पाचव्या आठवड्यात 5.75 कोटी कमावले आहेत. सहाव्या आठवड्याच्या शुक्रवार-शनिवार या दोन दिवसात अनुक्रमे 65 आणि 45 लाख कमवण्याची कामगिरी करत 336.51 कोटींचा एकूण गल्ला जमा केला आहे.
एकीकडे, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपट रिलीज झाला आहे. बुधवार ते शनिवार या चार दिवसात पद्मावतने 83 कोटींचं कलेक्शन जमवलं, मात्र 'टायगर..'च्या कमाईवर म्हणावा तितका प्रभाव न पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बाहुबली 2 (510 कोटी) पहिल्या स्थानावर आहे, तर आमीरचाच दंगल (374.53 कोटी) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 337.72 कोटी कमवणाऱ्या पीकेचं तिसरं स्थान आता टायगर हिरावून घेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement