एक्स्प्लोर

‘आझादी है गुन्हा, तो कबुल है सजा', ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चा ट्रेलर

तगडी स्टारकास्ट असलेला ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चा ट्रेलर रिलीज झाला.

मुंबई: ‘आझादी है गुन्हा, तो कबुल है सजा, अब तो होगा वही, जो है मंजुर ए खुदा’ असे दमदार डायलॉग आणि अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चा ट्रेलर रिलीज झाला. आमीर खानने सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी हा ट्रेलर ट्विट केला. त्यानंतर 11.47 पर्यंत या ट्रेलरला जवळपास 45 हजार लोकांनी पाहिला. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमिर खान, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.  येत्या दिवाळीत म्हणजेच 8 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे.  विजय कृष्ण आचार्य हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तर आदित्य चोप्रा या सिनेमाचे निर्माते आहेत. मराठमोळे संगीतकार अजय अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. आमीर खानने दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरुन या सिनेमाची घोषणा केली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात झळकणार असल्याचं आमीरने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. फातिमाची  निवड 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात फातिमा सना शेखची निवड ही आमीर खानमुळे झाल्याची चर्चा होती. मात्र आमीरची पत्नी किरण रावनेच याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे.  या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये आदित्य चोपडा, विजय कृष्ण आचार्य आणि आमीर खान या तिघांनी मिळून निर्णय घेतला. हा मोठा सिनेमा आहे, त्यामुळे निश्चितच फातिमाला विचारपूर्वकच भूमिका दिली असेल. शिवाय तिच्यात ती क्षमता आहे, त्यामुळेच तिला भूमिका मिळाली, असंही किरण रावने म्हटलं. फातिमाने आमीरच्या 'दंगल' सिनेमात पैलवान गीता फोगाटची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं आमिरसह अनेकांनी कौतुकही केलं होतं. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमात आमीर आणि फातिमासोबत, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ  हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. आमीर आणि बिग बी या सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. कतरिनाने यापूर्वी 'सरकार'मध्ये बिग बींसोबत आणि 'धूम 3' मध्ये आमिरसोबत काम केलेलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget