एक्स्प्लोर
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई
आमीर खानचा बहुप्रतिक्षीत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाची समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात निंदा केली असली तरी, आमीरच्या चाहत्यांनी समीक्षकांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमीर खानचा बहुप्रतिक्षीत 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाची समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात निंदा केली असली तरी, आमीरच्या चाहत्यांनी समीक्षकांना सणसणीत उत्तर दिले आहे. ठग्ज ऑफ हिंदोस्तानने पहिल्याच दिवशी तब्बल 52.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पन्नास कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा 'ठग्ज...' हा बाहुबलीनंतरचा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. सिने व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. यापूर्वी दिवाळीत प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाने 39 कोटी रुपयांची कमाई केली होती. यापूर्वी शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू इयर' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 43 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे आमिरच्या 'ठग्स'ने सलमान आणि शाहरुखचे रेकॉर्ड्स तोडले आहेत.#ThugsOfHindostan Thu biz... Hindi: ₹ 50.75 cr. Tamil + Telugu: ₹ 1.50 cr Total: ₹ 52.25 cr [5000 screens] India biz. Highest Day 1 for a #Diwali release Highest Day 1 for YRF film Highest Day 1 for a Hindi film
— taran adarsh (@taran_adarsh) November 9, 2018
TOP 5 - 2018 Day 1 / Opening Day biz... 1 #ThugsOfHindostan ₹ 52.25 cr [Hindi + Tamil + Telugu] 2. #Sanju ₹ 34.75 cr 3. #Race3 ₹ 29.17 cr 4. #Gold ₹ 25.25 cr 5. #Baaghi2 ₹ 25.10 cr Hindi movies. Nett BOC. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) November 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement