Salman Khan, Iulia Vantur : युलिया वंतूरने सलमान खानच्या कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस! व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
Salman Khan, Iulia Vantur : सलमान खान सतत युलिया वंतूरसोबत स्पॉट होत असतो. नुकताच सलमान खानने युलिया वंतूरचा 42वा वाढदिवस दणक्यात साजरा केला.

Salman Khan, Iulia Vantur : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. कधीकाळी त्याचे नाव कतरिना कैफसोबत जोडले गेले होते. यानंतर त्याचे नाव युलिया वंतूरशी (Lulia Vantur) जोडले जाऊ लागले. युलिया वंतूर ही सलमान खानची गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जाते. सलमान खान सतत युलिया वंतूरसोबत स्पॉट होत असतो. नुकताच सलमान खानने युलिया वंतूरचा 42वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दरम्यान सलमान खान आणि युलियाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये अभिनेता सलमान खानसह, सलमानचा भाऊ सोहेल खान, त्याचा मेहुणा आयुष शर्मा, सलमानचा अंगरक्षक शेरा, गायिका पायल देव आणि कॉस्च्युम डिझायनर अॅशले रेबेलो यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती. युलियाने तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आणि केक कटिंगची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. आयुष शर्मानेही त्याच्या इन्स्टा स्टोरीवर वाढदिवसाच्या पार्टीतील एक ग्रुप फोटोही शेअर केला होता.
पाहा व्हिडीओ:
युलिया वंतूरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती तिच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक देखील पार्टी मूडमध्ये आहेत. या व्हिडीओच्या शेवटी तिने पार्टीत सहभागी झालेल्या लोकांसोबतचा एक सेल्फीही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युलियाने एक आभार मानणारी पोस्टही लिहिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान आणि युलिया वंतूर यांची नावे एकमेकांसोबत जोडली जात आहेत. मात्र, दोघांनीही यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सलमान खान आणि युलिया वंतूर यांची पहिली भेट 2010मध्ये झाली होती. त्यावेळी सलमान खान 'बॉडीगार्ड' चित्रपटाचे शूटिंग करत होता. चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात सलमान खान जेव्हा रोमानियाला होता, तेव्हा त्याची भेट युलियाशी झाली. दोघांची ही पहिलीच भेट होती. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत स्पॉट होत असतात.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
