RRR सिनेमातील 'नाचो नाचो' गाणे झाले सुपरहिट, Alia Bhatt गाण्याचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
RRR New Song 'Naacho Naacho' Released: बिग बजेट RRR सिनेमातील नाचो नाचो गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यावर अभिनेता रामचरण आणि एनटीआर थिरकताना दिसून येत आहेत.
RRR New Song 'Naacho Naacho' Released: सुपरहिट बाहुबली सिनेमापेक्षा बिग बजेट 'RRR' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 7 जानेवारी 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बजेट सिनेमातील 'नाचो नाचो' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यावर अभिनेता रामचरण आणि एनटीआर थिरकताना दिसून येत आहेत. हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे.
It's time to shake a leg with my Dancing Dynamites @tarak9999 and @alwaysramcharan to the massy beats of #RRRMassAnthem.. :)#RRRMovie @mmkeeravaani https://t.co/H918V5CZkk
— rajamouli ss (@ssrajamouli) November 10, 2021
'आरआरआर' या सिनेमाचे दिग्दर्शन एसएस राजामौली (ss Rajamouli) यांनी केले आहे. या गाण्याच्या पार्श्वभूमीवर एक भव्य सेट दिसून येत आहे. सिनेमात महत्तवाची भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्टनेदेखील या गाण्याचा छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणे शेअर करत आलियाने लिहिले आहे,"सर्वसामान्यांना या दशकातील सर्वोत्तम गाण्यावर थिरकण्याची संधी".
View this post on Instagram
'नाचो नाचो' गाण्याचा व्हिडीओ शेअर करत साउथ अभिनेत्री समंथाने लिहिले आहे, 'वेडसर'. 'नाचो नाचो' या गाण्यामुळे एनटीआर आणि रामचरणच्या जोडीचे चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. हे गाणे प्रदर्शित होताच अवघ्या पाच तासांत यूट्यूबवर 13 लाख लोकांनी पाहिले आहे.
या चित्रपटाचा टीझरही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. टीझरमध्ये राजामौलीच्या स्टाईलचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. भव्य आणि नेत्रदीपक अॅक्शनमुळे सिनेमाचा दर्जा वाढला आहे. हा चित्रपट जगभरातील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.