The Kerala Story: 'चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी बंगालहून आसामला...'; द केरळ स्टोरी चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अदा शर्माची खास पोस्ट
अदा शर्मानं नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मानं नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
अदा शर्माची पोस्ट
अदा शर्मानं नुकतीच द केरळ स्टोरी या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'भारतीय जनतेचे अभिनंदन! तुम्ही सर्वांचे अभिनंदन ज्यांनी होर्डिंग्ज लावले,व्हिडिओ पोस्ट केले, मेसेज पसरवला, राज्यभर प्रवास केला (द केरळ स्टोरी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी लोकांनी बंगालहून आसामला जाण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बसचा व्हिडिओ पाहिला) तुम्हा सर्वांचा द केरळ स्टोरी हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. तुमच्या यशात माझा समावेश केल्याबद्दल धन्यवाद!'
'आंतरराष्ट्रीय स्तरावरही द केरळ स्टोरी हा चित्रपट अनेकांना आवडत आहे, हे पाहून आनंद झाला. यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांकडून आलेले मेसेज देखील मी वाचत आहे.' असंही अदानं पोस्टमध्ये लिहिलं.
View this post on Instagram
'द केरळ स्टोरी' ची स्टार कास्ट
द केरळ स्टोरी या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. अदानं या चित्रपटात शालिनी ही भूमिका साकरली आहे. शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटाचा विरोध काही राज्यांमध्ये करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अनेक लोक या चित्रपटाला 'प्रपोगंडा फिल्म' म्हणत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: