The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चं पंतप्रधानांनी केलं कौतुक; चित्रपटाच्या टीमची घेतली भेट
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं.
The Kashmir Files : सध्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या चित्रपटाच्या टीमची भेटी घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं.
'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल (Abhishek Agarwal), विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो अभिषेख अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. फोटो शेअर करून अभिषेक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या चित्रपटाचं कौतुक केलं. धन्यवाद मोदीजी.' हे ट्वीट शेअर करून अभिषेख यांनी नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे.
It was a pleasure to meet our Hon’ble Prime Minister Shri. Narendra Modi Ji.
— Abhishek Agarwal🇮🇳 (@AbhishekOfficl) March 12, 2022
What makes it more special is his appreciation and noble words about #TheKashmirFiles.
We've never been prouder to produce a film.
Thank you Modi Ji 🙏 @narendramodi @vivekagnihotri #ModiBlessedTKF 🛶 pic.twitter.com/H91njQM479
मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक हे कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :
- Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… 'व्हिक्टोरिया'साठी विराजसची खास पोस्ट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha