एक्स्प्लोर
आदित्य-श्रद्धाची सेन्शुअस केमिस्ट्री, 'हम्मा हम्मा' गाणं रिलीज
मुंबई : श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी 'ओके जानू' या सिनेमाचं 'हम्मा हम्मा' हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 90 च्या दशकात 'बॉम्बे' सिनेमातील 'हम्मा हम्मा' गाणं फारच लोकप्रिय झालं होतं. यामुळेच संगीतकार ए आर रहमानला नवी ओळख मिळाली होती.
आता 'ओके जानू'लाही ए आर रहमानचं संगीत आहे. पण या सिनेमातील 'हम्मा हम्मा' हे गाणं त्याने वेगळ्या अंदाजात सादर केलं आहे.
'बॉम्बे' सिनेमातील या गाण्यात अरविंद स्वामी, मनिषा कोईराला, सोनाली बेंद्रे आणि नागेंद्र प्रसाद दिसले होते. पण यावेळी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हम्मा हम्मावर डान्स करताना दिसणार आहेत. रहमान, बादशाह आणि तनिष्क यांनी हे गाणं गायलं आहे.
गाण्यात श्रद्धा आणि आदित्यमधील हॉट केमिस्ट्री आणि सेन्शुअस कोरिओग्राफी पाहायला मिळणार आहे. गाण्याला अतिशय फ्रेश आणि कलरफुल ट्रीटमेंट दिली आहे.
शाद अली दिग्दर्शित 'ओके जानू'ची निर्मिती करण जोहर आणि मणिरत्नम यांनी केली आहे. हा चित्रपट 13 जानेवारी 2017 रोजी रिलीज होणार आहे.
धर्मा प्रॉडक्शन आणि सोनी म्युझिक इंडियाने 15 डिसेंबरला रात्री 7 च्या सुमारास हे गाण रिलीज केलं. काही तासातचं या गाण्याला 45 लाखांहून व्ह्यूव्ज मिळाले आहेत. इतकंच नाही #TheHummaSong या हॅशटॅगने हे गाणं ट्विटवर टॉप ट्रेण्डिंगमध्ये आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement