एक्स्प्लोर

VIDEO : ...तेव्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे माझे प्राण वाचले : बिग बी

'माँ'ने ज्यापद्धतीनं जयाचं स्वागतं केलं ते मला आजही लक्षात आहे. स्वत:च्या सुनेचं स्वागत करावं तसं स्वागत त्यांनी जयाचं केलं होतं. त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना वडिलांप्रमाणे मानू लागलो.’

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा ‘ठाकरे’चं आज टीझर रिलीज करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित या सिनेमाचं पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी बाळासाहेबांच्या काही आठवण सांगताना बिग बी देखील भावूक झाले होते. ‘1982मध्ये कुली सिनेमाच्या शुटींगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका रुग्णालयात अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. त्यावेळी विमानतळावरुन थेट मला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेची रुग्णवाहिका माझ्यासाठी धावून आली होती. त्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कॅण्डीला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी त्यांचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती रुग्णवाहिका त्यावेळी तिथं आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती.’ अशी आठवण यावेळी अमिताभ यांनी सांगितली. अमिताभ बच्चन यांचं भाषण जसंच्या तसं बाळासाहेबांसोबत माझं कायमच कौटुंबिक नातं होतं. त्यांचा कोणत्याही कार्यक्रम असला की ते मला नेहमी बोलवायचे. आजही मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो कारण की, बाळासाहेब ठाकरेंशी निगडीत हा कार्यक्रम आहे. पण याला दुसरंही एक कारण आहे. ते म्हणजे संजय राऊत यांची लेखणी. कधीकधी त्यांची लेखणी मला तलवारीसारखी वाटते आणि त्याच्या भीतीनंच मी इथं आलो. दरम्यान, हा सिनेमा फक्त तीन तासापुरता मर्यादित ठेऊ नका. या सिनेमाचे अनेक भाग यावेत अशी माझी इच्छा आहे. कारण की, फक्त तीन तासात बाळासाहेब समजून घेता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर एखादी वेब सीरीज तयार व्हावी अशी माझी इच्छा आहे. ‘त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना वडिलांप्रमाणे मानू लागलो’ ‘मी ज्या दिवसापासून  बाळासाहेबांना भेटलो. तेव्हापासून त्यांना वाटलं की, मी त्यांच्या कुटुंबातीलच कुणीतरी एक आहे. जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझी त्यांच्याशी भेट झाली होती. त्याच दरम्यान, माझं लग्न झालं होतं. तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. मी जेव्हा ‘मातोश्री’वर गेलो. त्यावेळी 'माँ'ने ज्यापद्धतीनं जयाचं स्वागतं केलं ते मला आजही लक्षात आहे. स्वत:च्या सुनेचं स्वागत करावं तसं स्वागत त्यांनी जयाचं केलं होतं. त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना वडिलांप्रमाणे मानू लागलो.’ ‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’ ‘अनेकदा बाळसाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्या आजवर कुणालाही माहित नाही. तशा त्या फार वैयक्तिक आहे म्हणा... 1982मध्ये कुली सिनेमाच्या शुटींगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका रुग्णालयात अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. त्यावेळी विमानतळावरुन थेट मला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेची रुग्णवाहिका माझ्यासाठी धावून आली होती. त्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कॅण्डीला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी त्यांचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती रुग्णवाहिका त्यावेळी तिथं आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती.’ ‘...तेव्हा बाळासाहेबांएवढा धीर मला कुणीच दिला नव्हता’ ‘माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार यायचे. त्यावेळी बाळासाहेब नेहमी माझ्यासोबत असयाचे. अनेकदा माझ्यावर काही आरोपही व्हायचे त्यावेळी बाळासाहेब मला फोन करुन विचारायचे. हे चूक आहे की बरोबर?. एकदा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर असाच एक आरोप झाला होता. त्यावेळी त्यांनी मला फोन करुन मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि विचारलं की, हे आरोप खरे आहेत का? मी त्यांना सांगितलं की, हे आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर त्यांनी तडक मला सांगितलं. आता घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे.  एवढा धीर त्यावेळी दुसरा कोणत्याच व्यक्तीनं मला दिला नाही.’ ‘त्या’ क्षणी बाळासाहेबांच्या बाजूला माझा फोटो होता! ‘बाळासाहेब जेव्हा शेवटच्या क्षणी जेव्हा अंथरुणाला खिळले होते तेव्हा त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी मला उद्धव यांनी दिली. एका प्रबळ व्यक्तीला जेव्हा आपण अशा अवस्थेत बघतो त्यावेळी अक्षरश: हेलावून जातो. तेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो की, ते पुन्हा एकदा जिवंत व्हावे. तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही. मला कधीही वाटत नव्हतं की, मी त्यांना अशा अवस्थेत पाहिन. पण त्यावेळी मी आणखी एक आश्चर्याची गोष्ट त्यांच्या खोलीत पाहिली. मला माहिती होतं की, बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं. पण मी पाहिलं की, ते जिथे झोपले होते तिथे त्यांच्या उजव्या बाजूला एक फोटो होता. तो फोटो माझा होता. ते दृश्य पाहून मला फार भरुन आलं. ती घटना कायम माझ्या स्मरणात राहिल. मी त्यांना शतश: नमन करतो. या सिनेमासाठी कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास मला आवर्जून सांगा. मी माझ्या परिने होईल तेवढी मदत करेन.’ VIDEO :  संबंधित बातम्या : VIDEO: 'बाळासाहेब ठाकरे मला प्रेरणा देतील', नवाजुद्दीनचं मराठीत भाषण 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, रिलीजचा मुहूर्तही ठरला! 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget