एक्स्प्लोर

Vijay Thalapathy : होऊ दे धुरळा! दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचं इंस्टाग्रामवर पदार्पण; अवघ्या काही तासांत 40 लाख फॉलोअर्स

Vijay Thalapathy : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने इंस्टाग्रामवर (Instagram) धमाकेदार एन्ट्री केली आहे.

Vijay Thalapathy On Instagram : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने (Thalapathy Vijay) इंस्टाग्रामवर (Instagram) आपलं खातं उघडलं आहे. विजयच्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री करत विजयने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

इंस्टाग्रामवर एन्ट्री करताच थलापती विजयचे अवघ्या काही तासांत 40 लाख फॉलोअर्स झाले आहेत. थलापती विजयने इंस्टाग्रावर पदार्पण करत एक खास पोस्ट केली आहे. त्याने स्वत:चाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शन लिहिलं आहे,"नमस्कार मित्रांनो". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay (@actorvijay)

थलापती विजयचा इंस्टाग्रामवर जलवा!

इंस्टाग्राम एन्ट्रीमुळे थलापती विजय सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री केल्यावर अवघ्या काही तासांत विजयचे 40 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. तसेच त्याच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.  जवळपास 41 लाख लोकांनी विजयचा फोटो लाइक केला आहे. तसेच चाहते कमेंट करत विजयला शुभेच्छा देत आहेत. 

ट्वीटवर #ThalapathyOnINSTAGRAM ट्रेडिंगमध्ये

थलापती विजय इंस्टाग्रामवर येताच ट्वीटवर  '#ThalapathyOnINSTAGRAM' हे ट्रेडिंगमध्ये आहे. तसेच सर्वात पहिलं त्याला किर्ती सुरेश आणि रश्मिका मंदान्नाने फॉलो केलं आहे. थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याचे कोट्यवधी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अशातच आता विजयच्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. 

थपापती विजयचे आगामी प्रोजेक्ट (Vijay Thalapathy Upcoming Project)

थपापती विजयचा 'वरिसु' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमातील विजय आणि रश्मिका मंदान्नाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता लोकेश कनदराजच्या आगामी सिनेमात विजय झळकणार आहे. या सिनेमात विजयसह संजय दत्तदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमातदेखील विजयची झलक पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Beast : बीस्ट चित्रपट पाहिल्यानंतर नाराज झाले विजय थलापतीचे वडील; दिग्दर्शकाला म्हणाले, 'चित्रपटाची निर्मीती करण्याआधी...'

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget