एक्स्प्लोर

Telly Masala : 'हनुमान 2'मध्ये राम चरणची एन्ट्री ते रवीना टंडनने घेतलं सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Raveena Tandon : कपाळावर भस्म, साडी अन् 'हर हर महादेव'चा जयघोष; रवीना टंडनने लेकीसह घेतलं सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन; पाहा व्हिडीओ

Raveena Tandon Prayers Somnath Jyotirling Temple : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tondon) देवावर खूप श्रद्धा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने अनेकदा चाहत्यांना यासंदर्भात सांगितलं आहे. लेक राशा थदानीसोबत (Rasha Thadani) ती मंदिरात पूजा करतानाही दिसून येते. आता 'कर्मा कॉलिंग' (Karmma Calling) या वेबसीरिजच्या रिलीजआधी रवीनाने लेक राशासोबत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे (Somnath Jyotirling) दर्शन घेतलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ram Charan : जय हनुमान! साऊथ सुपरस्टार तेजा सज्जाच्या 'हनुमान 2'मध्ये राम चरणची एन्ट्री; साकारणार श्रीरामाची भूमिका

Ram Charan in Hanuman 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जाचा (Teja Sajja) 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. प्रेक्षकांना आता या सिनेमाच्या सीक्वेलची प्रतीक्षा आहे. दरम्यान 'हनुमान 2'मध्ये राम चरण श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hema Malini : मशिदीचा वाद मिटला पाहिजे, आता मथुरेतही कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे : हेमा मालिनी

Hema Malini : अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर (Ram Mandir) होत आहे. ही फार आनंदाची बाब आहे. आता मथुरेतही कृष्णाचे मंदिर झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. तुम्ही मथुरा पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की, हे मंदिरांचे शहर आहे. मात्र, कृष्णाच्या जन्मस्थानी (Krushna Janmbhoomi) मशीद बांधली गेली. मथुरेत कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे. मशिदीचा वाद मिटला पाहिजे. सध्या तिथे एक मंदिर आहे. ते मंदिर फार सुंदर आहे. मात्र, त्याठिकाणी आणखी एक भव्य मंदिर बांधले पाहिजे, असे मत भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी व्यक्त केलय. एका वृत्तसंस्थेशी त्यांनी अयोध्येत संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

VIDEO: "मावळ आम्ही वादळ आम्ही" ते "काय सांगू राणी मला गाव सुटना"; टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, एकदा व्हिडीओ पाहाच!

Kili Paul: सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स नेटकरी शेअर करतात. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. अशताच किलीनं काही मराठमोळ्या गाण्यांवरील रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. या रिल्सला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. तसेच या रिल्समधील किलीच्या मराठमोळ्या अंदाजाचं अनेकजण कौतुक करत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bhakshak Teaser Out : सत्य समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकाराची कहाणी; 'भक्षक' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

Bhakshak Teaser Out: अभिनेत्री भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) ही त्याच्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या थँक्यू फॉर कमिंग, दम लगाके हईशा या चित्रपटातील भूमिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता भूमि ही नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'भक्षक' (Bhakshak) असं आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये भूमि ही पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget