VIDEO: "मावळ आम्ही वादळ आम्ही" ते "काय सांगू राणी मला गाव सुटना"; टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, एकदा व्हिडीओ पाहाच!
Kili Paul: किलीनं काही मराठमोळ्या गाण्यांवरील रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. या रिल्सला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
![VIDEO: Kili Paul videos on marathi songs share video on maval amhi vadal amhi song VIDEO:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/18/0a86558992add2d35136fd82cae8038c1705566469958259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kili Paul: सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स नेटकरी शेअर करतात. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. अशताच किलीनं काही मराठमोळ्या गाण्यांवरील रिल्स इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. या रिल्सला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. तसेच या रिल्समधील किलीच्या मराठमोळ्या अंदाजाचं अनेकजण कौतुक करत आहेत.
किली पॉलचा मराठमोळा अंदाज
किली पॉलनं शेर शिवराज या चित्रपटातील "मावळ आम्ही वादळ आम्ही",या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. एक नेटकऱ्यानं किलीच्या या व्हिडीओला कमेंट केली, "भावा आपलं मनं जिकलंस तू,जय शिवराय" तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओवर कमेंट केली, "या जगातील प्रत्येक मराठी माणसाचे हृदय तू जिंकले आहेस" किली पॉलच्या या व्हिडीओला 1.2 मिलियनपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
"काय सांगू राणी मला गाव सुटना" आणि "नांदण नांदण रमाचं नांदण" या मराठी गाण्यांवरील व्हिडीओ देखील किली पॉलनं शेअर केला आहे. या व्हिडीओला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहेत.
View this post on Instagram
किली अनेकवेळा मराठी गाण्यांवरील रिल्स शेअर करत असतो. किली आणि नीमा यांनी याआधी 'बहरला हा मधुमास नवा', 'एका वाघाची शिकार एका हरणीने केली' या मराठी गाण्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
किली आणि त्याची किलीची बहीण नीमा हे दोघे सोशल मीडियावर विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. किली सोशल मीडियावर विविध डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. त्याला इन्स्टाग्रामवर 6.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. किली हा टांझानियामध्ये राहतो. पण तो बॉलिवूडमधील गाण्यांवरील आणि मराठी गाण्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)