एक्स्प्लोर

Ram Charan : जय हनुमान! साऊथ सुपरस्टार तेजा सज्जाच्या 'हनुमान 2'मध्ये राम चरणची एन्ट्री; साकारणार श्रीरामाची भूमिका

Ram Charan in Hanuman 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जाच्या (Teja Sajja) आगामी 'हनुमान 2' या सिनेमात राम चरण श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ram Charan in Hanuman 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जाचा (Teja Sajja) 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. प्रेक्षकांना आता या सिनेमाच्या सीक्वेलची प्रतीक्षा आहे. दरम्यान 'हनुमान 2'मध्ये राम चरण श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

रवी तेजाचा 'हनुमान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. प्रशांत वर्मा (Prashant Varma) दिग्दर्शित या सिनेमात तेलुगू स्टार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हनुमान 2' या सिनेमाचं नाव 'जय हनुमान' असं असणार आहे. या सिनेमाच्या कास्टिंगला आता सुरुवात झाली आहे.

'हनुमान 2'मध्ये राम चरण झळकणार श्रीरामाच्या भूमिकेत

'हनुमान 2' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित या सिनेमातील श्रीरामाच्या भूमिकेसाठी निर्माते राम चरणचा विचार करत आहेत. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'अधीरा' या सिनेमानंतर प्रशांत वर्मा 'जय हनुमान' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतात. राम चरणच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याचा 'गेम चेंजर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

View this post on Instagram
 
A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

बॉक्स ऑफिसवर 'हनुमान'चा बोलबाला (Hanuman Box Office Collection)

'हनुमान' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 70 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी हनुमानने 8.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 12.45 कोटी, तिसऱ्या दिवशी 16 कोटी, चौथ्या दिवशी 15.2 कोटी, पाचव्या दिवशी 13.11 कोटी आणि सहाव्या दिवशी 5.94 कोटींची कमाई केली. एकंदरीत रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 74.9 कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते.

'हनुमान' या सिनेमाचा देशभरातील सिनेमागृहांत बोलबाला आहे. अंजनाद्री गावात राहणाऱ्या हनुमंतची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. हनुमंतची भूमिका साऊथ स्टार तेजा सज्जाने साकारली आहे. हा रोमांचक सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे.

संबंधित बातम्या

Hanuman Review : अवश्य पाहावा असा आणखी एक भारतीय सुपरहीरो 'हनुमान'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget