Telly Masala : तापसी पन्नूनं गुपचूप उरकलं लग्न ते 'आई कुठे काय करते'च्या ट्विस्टवर अरुंधती म्हणते..; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Taapsee Pannu : ना आमंत्रण, ना गाजावाजा; अभिनेत्री तापसी पन्नूनं गुपचूप उरकलं लग्न! टीम इंडियाच्या कोचसोबत बांधली लग्नगाठ
Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) अखेर विवाहबंधनात अडकली असल्याचे वृत्त आहे. तापसीने उदयपूर (Udaipur) येथे गुपचूपपणे लग्नगाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये 23 मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडला असल्याचे वृत्त आहे. टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बो (Mathias Boe) सोबत तिने विवाह केला. तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Lok Sabha Election BJP : अरुण गोविलच नाही तर रामायण-महाभारत मालिकेतील हे कलाकारही होते निवडणुकीच्या रणांगणात
Lok Sabha Elections 2024 and Celebrities : टीव्ही-चित्रपटातील कलाकारांचा एक मोठा चाहता वर्ग असतो. त्यामुळेच राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारात कलाकारांना उतरवले जाते. काही वेळेस राजकीय पक्षांनी कलाकारांना थेट निवडणुकीच्या रिंगणातही उतरवले आहे. त्यातील काही कलाकारांची राजकीय पटलावरील इनिंग भारदस्त राहिली तर काहीची फारशी प्रभावी ठरली नाही. दक्षिण भारतात तर कलाकारांनी स्वत:चे पक्ष काढले आणि सत्तेवरही आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) भाजपने (BJP) छोट्या पडद्यावर श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल (Arun Govil) यांना उतरवले आहे. मात्र, रामायण (Ramayan)-महाभारत (Mahabharat) मालिकेतील कलाकार याआधीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mahabharat : 13 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत, टीव्ही मालिका महाभारतातील 'कृष्णा'ची खदखद, बायकोवर गंभीर आरोप
Nitish Bharadwaj : 'महाभारत' (Mahabharat) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात महाभारत सुरू आहे. नितीश यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त पत्नी आयएएस (IAS) अधिकारी स्मिता घाटे (Smita Ghate) विरोधात पोलिसात धाव घेतली होती. पत्नीने आपल्या मुलींचे अपहरण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. घटस्फोटाची प्रोसेस सुरू होण्याआधीपासून नितीश आणि स्मिताने शारीरिक संबंध ठेवणं बंद केलं होतं. स्मिताला फक्त पैसे उकळायचे होते आणि मी तिला मुलं जन्माला घालण्यासाठी हवा होतो. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ न दिल्याचं खदखद नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khatron Ke Khiladi 14: माधुरीच्या 'डान्स दिवाने'ची जागा घेणार 'खतरों के खिलाडी 14'?, जाणून घ्या कधीपासून सुरु होणार रोहित शेट्टीचा शो
Khatron Ke Khiladi 14 Rohit Shetty Show : थरारक, रंजक आणि उत्साही असा कार्यक्रम म्हणजे 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi). या कार्यक्रमात होणाऱ्या स्टंट्समुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतो. तसेच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) सूत्रसंचालनामुळे या कार्यक्रमाला चार चांद येतात. त्यातच या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीचा 14वा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. असे म्हटले जात आहे की निर्मात्यांनी आधीच गोष्टी फायनल केल्या आहेत, मग ते स्पर्धक असो किंवा लोकेशन. पण अद्याप याबबात कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : "अजून किती रडत बसणारेस";'आई कुठे काय करते'मधील अरुंधती खऱ्या आयुष्यात लेकीला मालिका दाखवत नाही
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सध्या धक्कादायक ट्विस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) अरुंधती हे पात्र साकारत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती घराघरांत पोहोचली आहे. मालिकेत आता अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचा मृत्यू झालेला दाखवण्यात आलं आहे. या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे. मालिकेत सतत काही ना ट्वीस्ट येत असतात. त्यामुळे अरुंधतीने मालिका आपल्या मुलीला न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अरुंधतीची खऱ्या आयुष्यातील आईदेखील मालिकेच्या कथानकावर नाराज आहे.