Mahabharat : 13 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत, टीव्ही मालिका महाभारतातील 'कृष्णा'ची खदखद, बायकोवर गंभीर आरोप
Nitish Bharadwaj : 'महाभारत' (Mahabharat) या लोकप्रिय मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. 13 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.
Nitish Bharadwaj : 'महाभारत' (Mahabharat) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात महाभारत सुरू आहे. नितीश यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त पत्नी आयएएस (IAS) अधिकारी स्मिता घाटे (Smita Ghate) विरोधात पोलिसात धाव घेतली होती. पत्नीने आपल्या मुलींचे अपहरण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. घटस्फोटाची प्रोसेस सुरू होण्याआधीपासून नितीश आणि स्मिताने शारीरिक संबंध ठेवणं बंद केलं होतं. स्मिताला फक्त पैसे उकळायचे होते आणि मी तिला मुलं जन्माला घालण्यासाठी हवा होतो. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ न दिल्याचं खदखद नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.
नितीश भारद्वाज यांनी IAS पत्नी स्मिता घाटेविरोधात न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान नितीश आणि स्मिताचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू आहे. नुकतचं टाइम्स नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. मी फक्त नावाचा पती आहे. गेल्या काही दिवसांपासून मला मानसिक त्रास होत आहे. माझ्या पत्नीला माझी गरज नाही. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत, असं नितीश भारद्वाज म्हणाले आहेत.
नीतीश भारद्वाज आपल्या मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी काही दिवसांपासून न्यायालयीन लढा देत आहेत. IAS पत्नी स्मिता यांचा आरोप आहे की, नितीश त्यांना नोकरी करू देत नाही. दरम्यान टाइम्स नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत नीतीश भारद्वाज म्हणाले की,"मी जुन्या विचारसरणीचा आहे, असं स्मिताला जगाला दाखवायचं आहे. स्मिता सस्पेंड झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली होती. त्यावेळी माझा तिला पाठिंबा होता. स्मिताला घरी बसवायचं असतं तर मी तिला पाठिंबा दिला नसता. माझ्यासोबत संसार थाटण्याआधी स्मिताचे दोन घटस्फोट झाले होते. पण त्यावेळी लोकांनी मला तिच्यासोबत संसार थाटण्याचा सल्ला दिला".
घर केलं स्वत:च्या नावावर
नितीश म्हणाले की,"2012 मध्ये आम्हाला जुळी मुलं झाली. प्रेग्नंट झाल्यानंतर स्मिताने पुण्यात एक घर विकत घेतलं होतं. इंडस्ट्रीतील लोकांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे स्मिताच्या नावावर आम्ही घर घेतलं होतं. पण या घराचे पैसे मी दिले होते. तरी स्मिताने फक्त तिच्या एकटीच्या नावावर मला हे घर करायला लावलं.
घर घेतल्यानंतर नितीश आणि स्मिताचे वाद व्हायला सुरुवात झाली. नितीश म्हणाले,"स्मिताचा स्वभाव खूप वेगळा होता. तिला पती-पत्नी हे रिलेशन नको होतं. पण तरी तिला लग्न का करायचं होतं हे मला कळलं नाही. आतापर्यंत तीन वेळा तिने लग्न केलं आहे. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत. मी तिच्याजवळ गेल्यावर ती वेगळ्या खोलीत जायची. मुलं माझ्यासोबत येऊन झोपायची. शारीरिक संबंध ठेवण्यास ती नेहमीच नकार देत असे. पुढे मुलांना भेटण्यासही ती नकार देऊ लागली. व्हॉट्सअॅपवर तिने मला ब्लॉक केलं होतं आणि मी तिला ब्लॉक केलंय असं तिने मुलांना सांगितलं. मुलांसोबत तिने मला वेळ घालवू दिला नाही. स्मिताला फक्त माझे पैसे हवे होते. मी एटीएम कार्ड नाही तर एक व्यक्ती आहे. स्मितासारखे माझे मुलं होऊ नयेत, असं मला वाटतं.
संबंधित बातम्या