Telly Masala : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, वरुण ग्रोव्हरच्या 'ऑल इंडिया रँक'चा ट्रेलर लाँच; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आव्वाज भारताचा; फ्युजन बँड शक्ती आणि राकेश चौरसिया यांचा सन्मान
Grammy Awards 2024 : जगातील मानाचा समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी संगीत पुरस्कार (Grammy Awards 2024 ) सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी आपली मोहोर उमटवली आहे. भारतीय फ्युजन बँड 'शक्ती'ला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या म्युझिक बँडमध्ये शंकर महादेवन (Shankar Mahadevan), जॉन मॅक्लॉफलिन, झाकीर हुसैन (Zakir Hussain), व्ही. सेल्वागणेश (V. Selvaganesh) आणि गणेश राजगोपालन आदी कलाकारांचा समावेश आहे. या बँडशिवाय, बासुरी वादक राकेश चौरसिया यांनीदेखील ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. आज, 5 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
सुखं म्हणजे नक्की हेच असतं! 24 व्या वर्षी गिरीजा प्रभूने मुंबईत घेतलं हक्काचे घर
सुखं म्हणजे नक्की काय असतं’असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकजण आपल्या परीने त्याची उत्तरे शोधतात. मात्र, स्वप्नांचे शहर म्हटले जाणाऱ्या मुंबईत हक्काचे घर असणे हेदेखील अनेकांचे स्वप्न असते. ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री गिरीजा प्रभूने (Girija Prabhu) मुंबईत आपले हक्काचे घर घेतले आहे. अवघ्या 24 व्या वर्षीने तिने मुंबईत घर घेतल्याने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
'मसान'चा लेखक वरुण ग्रोव्हर झाला दिग्दर्शक; 'ऑल इंडिया रँक'चा ट्रेलर लाँच
'सेक्रेड गेम्स'सारखी वेब सीरीज आणि 'मसान' (Masan) सारख्या चित्रपटाचा लेखक वरुण ग्रोव्हर (Varun Grover) आता रुपेरी पडद्यावर नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाला आहे. वरुण ग्रोव्हर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. 'ऑल इंडिया रँक' (All India Rank) या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले असून आज त्याचा ट्रेलर लाँच (All India Rank Trailer Launch) करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
अभिषेकचे 4 वर्षात 17 फ्लॉप चित्रपट, पण अपयशाने खचला नाही, आज 280 कोटींच्या संपत्तीचा मालक
अभिषेक बच्चनला वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत झालेली तुलना मारक ठरली. त्यामुळे अभिषेकला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान गाठता आलं नाही.युवा, गुरू, रावण, मनमर्जियां सारख्या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले होते. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या 4 वर्षात 17 चित्रपट फ्लॉप झाले असले तरी अभिषेकने खचून न जाता बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
तीन ग्रॅमी अॅवार्ड पटकावले पण स्टेजवरून उतरताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या; दिग्गज रॅपरने केले काय?
Grammy Awards 2024 : अमेरिकेतील 66 व्या ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards 2024) सोहळ्यात धक्कादायक नाट्यमय घडामोडी घडल्या. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रॅपर सिंगर किलर माईक (Killer Mike) याने तीन पुरस्कार पटकावले. मात्र, पुरस्कार स्वीकारल्यानंतर रॅपर किलर माईकला पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.