एक्स्प्लोर

Telly Masala : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर ते बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी स्वत:ची ओळख सांगितली; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

प्रसिद्ध बॉलिवूड गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर, 77 व्या वर्षी आईचं निधन

Adnan Sami Mother Passes Away : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अदनान सामीला मातृशोक झाला आहे. अदनान सामीची आई बेगम नौरीन यामी यांच्या निधनाची मोठी बातमी दु:खद बातमी समोर आली आहे. नौरीन सामी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी नौरीज सामी यांनी अखेरचा श्वास घेतला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

TMKOC Sonu : 'तारक मेहता...' मालिकेतून 'सोनू'ला बाहेरचा रस्ता, आता 'ही' नवीन अभिनेत्री साकारणार व्यक्तिरेखा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या शोची मोठी फॅन फॉलोईंग आहे. गेल्या काही काळापासून 'तारक मेहता...' शो वादात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळात शोच्या निर्मात्यांचा कलाकारांशी वाद होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी शो सोडला आहे, तर काहींना निर्मात्यांनीच शोच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

"ऐश्वर्याला मंगळ, ज्या घरात जाईल, त्यांचं वाटोळं होईल", जेव्हा अफवांवर संतापलेले बिग बी, दिलेलं सडेतोड उत्तर

Aishwarya Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) म्हणजे, बॉलिवूडमधील सर्वात फेवरेट कपल. दोघांनी 2007 मध्ये आपली लग्नगाठ बांधली होती. विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली. पण, ज्यावेळी बीटाऊनमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या, त्याचवेळी दोघांबाबत अनेक अफवादेखील उडाल्या होत्या. ऐश्वर्या रायला मंगळ असून अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी तिचं लग्न एका झाडाशी लावण्यात आल्याचा दावा देखील त्यावेळी करण्यात आला होता. काही रिपोर्ट्समध्ये ऐश्वर्या बच्चन कुटुंबासाठी अशुभ असल्याचंही म्हटलं होतं. या बातमीनं अमिताभ बच्चन संतापले आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi : रियालिटी शो की, सिंपथी शो...? गुलिगत सूरज बिग बॉस विनर ठरल्यानंतर मिताली मयेकरची इन्स्टा स्टोरी, पण काही तासांतच...

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या धमाकेदार सीझनचा समारोप झाला आहे. रिल्स स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता बनला आहे. सूरजच्या विजयानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणींनी सूरज चव्हाणचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. तर, याउलट सोशल मीडियावर एक दुसरा वर्ग आहे, जो सूरजच्या विजयाला विरोध करत आहे. यातच आता बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाण जिंकल्यावर अभिनेत्री मिताली मयेकर नाराज असल्याची चर्चा आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण हटवण्यासाठी कोर्टात लढलो, बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी स्वत:ची ओळख सांगितली!

Bigg Boss New Season : सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉसच्या नवीन सीझनला सुरुवात झाली आहे. धमाकेदार ग्रँड प्रीमियरसह 6 ऑक्टोबरला बिग बॉस 18 सीझनला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात 18 सदस्यांना एन्ट्री मिळाली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच गुणरत्न सदावर्तेंनी सदस्यांना स्वत:ची खास ओळख सांगितली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Happy Birthday Abhijeet Sawant : पत्र्याच्या शेडमध्ये राहिला, 'इंडियन आयडॉल'नं नशीब चमकलं, बिग बॉस मराठीचा 'जेंटलमन' अभिजीत सावंत कोट्यवधींचा मालक

Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंत याचा आज 7 ऑक्टोबर रोजी 43 वा वाढदिवस आहे. अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीझन 8 चा उपविजेता ठरला आहे. 'इंडियन आयडॉल 1' चा पहिला गायक अभिजीत सावंत शो जिंकल्यानंतर बरेच दिवस प्रसिद्धीपासून दूर होता. यानंतर तो बिग बॉसमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकला. अभिजीत सावंतला प्रेक्षकांचा भरभरुन पाठिंबा मिळाल्याचा पाहायला मिळालं. अभिजीतचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार खडतर आहे. अभिजीत सावंतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबाबत जाणून घ्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Embed widget