एक्स्प्लोर

The Crew: 'द क्रू' चित्रपटाची घोषणा; तब्बू, करिना अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा 'द क्रू' (The Crew) चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

The Crew: तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर 'लीडिंग लेडीज' कॉमिक कॅपर 'द क्रू' (The Crew) साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती 'वीरे दी वेडिंग'च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली असून, दर्शकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

संघर्ष करणाऱ्या एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित 'द क्रू' एक मजेशीर कॉमेडी असेल. चित्रपटात तीन महिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्व काही अतूट प्रयत्न करताना पाहायला मिळतील. परंतु, त्यांच्या नशिबी अनोखी परिस्थिती निर्माण होते आणि ते खोट्याच्या जाळ्यात अडकतात. 'द क्रू'हा चित्रपट चुका आणि विविध घडामोडींच्या विनोदाने भरपूर आहे. 

निर्माती एकता आर कपूर म्हणाल्या, "वीरे दी वेडिंगच्या यशानंतर, बालाजी मोशन पिक्चर्सला रिया कपूरसोबत आणखी एका चित्रपटासाठी काम करण्यास आनंद झाला आहे. तब्बू, क्रिती आणि करीना 'द क्रू'साठी योग्य असून, हा चित्रपट खूप मनोरंजक आणि विनोदाने भरपूर आहे. ही कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी थांबू शकत नाही.”

निर्माती रिया कपूर म्हणाल्या, "माझ्या पुढच्या चित्रपटासाठी या तीन सुंदर, प्रतिभावान कलाकारांना आणणे हे एक स्वप्न आहे. मी उत्साहित आणि दृढनिश्चयी  आहे आणि चित्रीकरण सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तसेच, 'वीरे दी वेडिंग'नंतर मी एकतासोबत दुसऱ्यांदा काम करत आहे आणि ती मला सपोर्ट करत आहे हि माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे."

क्रिती सॅनन म्हणाल्या, "मी नेहमीच सशक्त पात्रे आणि अनोख्या कथांसाठी उत्सुक असते आणि 'द क्रू' त्यापैकी एक आहे. तब्बू मॅम आणि करीना या दोन प्रतिभावंतांसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. मी नेहमीच त्यांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे आणि पाहिले आहे. मी तब्बू मॅमला काही प्रसंगी भेटले आहे आणि त्या नेहमीच खूप उत्साही राहिल्या आहेत. बेबो आयकॉनिक आहे, आणि मी त्यांची नेहमीच फॅनगर्ल राहिली आहे. दुसरीकडे, रिया आणि एकता या उत्कृष्ट आणि सशक्त निर्मात्या आहेत ज्यांनी सशक्त आणि प्रगतीशील महिला पात्रांना आणि थीमला समर्थन दिले आहे. मला नेहमीच एक मजेशीर आणि अनोखा महिला चित्रपट करायचा होता आणि या चित्रपटाने माझी हि इच्छा पूर्ण केली असून, मला लगेच स्क्रिप्ट आवडली. हा प्रवास सुरू करण्यासाठी  मी प्रतीक्षा करू शकत नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Kriti (@kritisanon)

याबाबत बोलताना करीना कपूर म्हणाल्या, "वीरे दी वेडिंग'चे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. रिया आणि एकतासोबत काम करण्याचा हा एक छान प्रवास होता. त्यामुळे जेव्हा रिया तिचा नवीन प्रोजेक्ट 'द क्रू' घेऊन माझ्याकडे आली तेव्हा मला खूप उत्सुकता होती. याचा अर्थ असा आहे की मला तब्बू आणि क्रिती या दोन उत्कृष्ट कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची संधी मिळत आहे. मी हा प्रोजेक्ट सुरू करण्यास उत्सुक आहे. 

यावर पुढे बोलताना तब्बू म्हणाल्या, "या चित्रपटात निर्माता आणि दिग्दर्शक राजेश कृष्णन यांच्यासोबतच करीना आणि क्रिती या दोन सुंदर आणि प्रतिभावान महिला तसेच, रिया आणि एकता या दोन महिलांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. वेडेपणा, आनंद, पात्रांच्या चढ-उतारांसह, हि एक रोलर कोस्टर असणार आहे आणि मी त्यावर स्वार होण्याची वाट पाहत आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Bigg Boss Marathi 4: टास्कमध्ये होणार तुफान राडा; बिग बॉसच्या घरात नवा ग्रुप तयार होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Christmas Holiday : कोकण ते नाशिक, तुळजापूर ते कोल्हापूर; नाताळची सुट्टी, पर्यटनं गजबजलीSuresh Dhas on Beed Massajog Crime : 'मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकत्व घ्यावं'Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; आदिती तटकरे म्हणतात...Devendra Fadnavis :वाल्मिक कराडचा प्रश्नावर,फडणवीस म्हणाले..कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक कमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर
TRAI : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख यूजर्स गमावले, चार महिन्यात 1.6 कोटी ग्राहकांनी साथ सोडली
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
Embed widget