Maharashtra Christmas Holiday : कोकण ते नाशिक, तुळजापूर ते कोल्हापूर; नाताळची सुट्टी, पर्यटनं गजबजली
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटकमधून भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत.
ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने कोल्हापुरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत.
अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. अक्कलकोट नगरी भाविकांनी अक्षरशः फुलून गेलीय. नाताळाच्या सुट्टीमुळे मुंबई, पुण्याहून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोट इथे दाखल झाले आहेत.
नाताळ आणि वर्षाचा शेवट असल्याने शेगाव इथे संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यातूनच नव्हे तर शेजारील गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा या राज्यातून संत गजानन महाराजांचे भक्त शेगावात दाखल झाले आहेत.
सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून एक ते दीड किलोमीटर पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी पर्यटकांना तीन ते चार तासांचा वेळ लागतोय. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या काळात पर्यटक धार्मिक स्थळांना पसंती देत आहेत.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा जल्लोष करताना अनेक पर्यटक पर्यटनवारी करतात. भंडाऱ्यातील ऐतिहासिक अंबागड गडकिल्ल्याचं संवर्धन आणि जतन व्हावं यासाठी तरुणाईनं साफसफाई, स्वच्छता मोहीम राबवून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज केलाय.
सुट्ट्यांमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी मोठी झाली आहे. बिबट्या ...वाघ....अस्वलांच्या दर्शनाने पर्यटकांचा वाढला ओढा वाढला आहे.
ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे पाय कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर वळले आहेत.सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर, सागरेश्वर, वेंगुर्ले बंदर, भोगवे, तारकर्ली, देवबाग, मालवण, तळाशील, चिवला बीच या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी झाली आहे.