Taapsee Pannu : इश्क दी बाजियां...! सिंगल तापसी आता मिंगल होणार; टीम इंडियाच्या कोचसोबत बांधणार लग्नगाठ
Taapsee Pannu : आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री तापसी पन्नू आता लग्नगाठ बांधणार आहे.
Taapsee Pannu : सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकत आहेत. आता आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आता लग्नगाठ बांधणार आहे. तापसी ही बॅडमिंटनपटूसोबत विवाहबद्ध होणार आहे. तापसी आपला प्रियकर मॅथियास बो (Mathias Boe) सोबत विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक आहे.
वृत्तानुसार, तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांनी 2024 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तापसीने आपल्या विवाहासाठी राजस्थानमधील उदयपूरची निवड केली असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी तापसीचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी या अभिनेत्रींनीही त्यांच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली होती.
View this post on Instagram
दरम्यान, तापसीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तापसीने आपले प्रेमसंबंध कधीही लपवून ठेवले नाही. अनेकदा तापसीने आपल्या प्रियकरासोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. सोशल मीडियावरही दोघांनी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तापसीचा प्रियकर मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. 2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे.
View this post on Instagram
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून रुपेरी पडद्यावर झळकली
तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2010 मध्ये तापसीने 'झुम्मंडी नादम' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तापसीने 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' या चित्रपटामधून पदार्पण केले होते. 'जुडवा 2', 'गेम ओव्हर', 'बदला', 'नाम शबाना', 'पिंक' आणि 'शाबाश मिठू' असे अनेक चित्रपट आहेत.