Swatantra Veer Savarkar : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा सिनेमा आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar ) हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी आता ओटीटीवरही रिलीज होणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा तुम्ही घरबसल्याही पाहू शकता. हा सिनेमा 22 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला होता. या सिनेमात अंकिता लोखंडेसह अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून हा सिनेमा ओटीटीवरही रिलीज होणार आहे.
'स्वातंत्र्य वीर सावरकर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही फार कमाई केली नाही. पण या सिनेमातील रणदीप हुड्डाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमात रणदीपनेच सावकरांची भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्याने बरीच मेहनत देखील घेतली होती. त्यानंतर आता निर्मात्यांनी अखेर चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार?
स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट वीर सावरकरांच्या 141 व्या जयंतीनिमित्त ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. म्हणजे येत्या 28 मे रोजी हा सिनेमा ZEE5 वर प्रदर्शित करण्यात येईल. यासंदर्भात निर्मात्यांनी सोशल मीडियावर सिनेमाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केली आहे. रणदीप आणि अंकिता यांच्याशिवाय या चित्रपटात अमित सियालने गणेश दामोदर सावरकर, राजेश खेरा यांनी महात्मा गांधींची भूमिका, लोकेश मित्तल यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 31.23 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात दिग्दर्शन आणि अभिनयासोबतच रणवीरने या चित्रपटाची सहनिर्मिती आणि सहलेखनही केले आहे.
View this post on Instagram
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अपिंदरदीप सिंह, अमित सियाल, मार्क बेनिंगटन आणि एमिली आर एकलँड हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. झी स्टुडिओ, आनंद पंडित, संदीप सिंह, रणदीप आणि योगेश राहन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर रूपा पंडित, सैम खान, अनवर अली आणि पांचाली चक्रवर्ती यांनी सहनिर्मिती केली आहे. 20 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.