VIDEO : 'कंगुवा' इव्हेंटमध्ये सुपरस्टार सूर्याला पाहताच भडकला पापाराझी, अभिनेत्याने हात जोडून मागितली माफी
Suriya Apologise to Media : साऊथ सुपरस्टार सूर्या मीडियाची माफी मागतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Suriya Apologise to Media : साऊथ सुपरस्टार सूर्या सध्या त्याच्या कंगुवा चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अभिनेता सूर्या सध्या कंगुवा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. कंगुवा चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा अभिनेता सूर्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पापाराझी अभिनेता सूर्याला पाहून भडकल्याचं दिसत आहे, तर अभिनेता सूर्या मीडियासमोर माफी मागताना दिसत आहे. सूर्याचा माफी मागतानाचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असून हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
'कंगुवा' इव्हेंटमध्ये सुपरस्टार सूर्याला पाहताच भडकला पापाराझी
सुपरस्टार सूर्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक पापाराझी त्याच्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ 'कंगुवा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या कार्यक्रमातील आहे. 'कंगुवा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. कंगुवाच्या प्रमोशनसाठी प्रेस कान्फरेन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अभिनेता सूर्या उशिरा पोहोचला त्यामुळे एका फोटोग्राफरला राग आला. बसण्याच्या मुद्द्यावरही तो नाराज होता, याबाबत त्याने सूर्याकडे नाराजी व्यक्त केली. पण अभिनेता सूर्याने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
अभिनेत्याने हात जोडून मागितली माफी
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगुवाच्या प्रमोशन इव्हेंटसाठी सूर्या मुंबईत पोहोचताच एक पापाराझीने त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. पापाराझीने तक्रार करण्यास सुरुवात केली, जी अभिनेत्याने अतिशय शांतपणे ऐकली आणि त्यानंतर झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली.
अभिनेता सूर्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक
कंगुवाच्या प्रमोशनसाठी मुंबईत एक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. मात्र, अभिनेता सूर्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचला. यानंतर पापाराझीने नाराजी व्यक्त करताच अभिनेता सूर्याने सर्व मीडियाची माफी मागितली. यावेळी सूर्या म्हणाला की, "प्रमोशनसाठी आम्ही सध्या अनेक ठिकाणी प्रवास करत आहोत.मुंबईतील वाहतूक कोंडी तुम्हाला माहित आहे, पण यावेळी आम्ही एअर ट्राफीकमध्ये अडकल्यामुळे आम्हाला उशिर झाला. हे कारण देत नाही, पण उशिर झाल्याबद्दल माफी मागतो". पुढे सूर्या नाराजी व्यक्त करणाऱ्या पापाराझीला म्हणाला, "सर, तुम्हीही आम्हांला प्रेम द्याल, ही अपेक्षा". अभिनेता सूर्याने ज्याप्रकारे ही सर्व परिस्थिती हाताळली त्याचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ
What a star 🌟
— Ashwani kumar (@BorntobeAshwani) November 12, 2024
Superstar #Suriya apologised for the late arrival and the ruckus incident for his bodyguard. 👏
Its just 2 days and #Kanguva coming on the screens 🔥@Suriya_offl https://t.co/VxjfdIkTIh pic.twitter.com/ggNMwy5ViV
महत्त्वाच्या इतर बातम्या :