एक्स्प्लोर
बिहारमधील भरती परीक्षेत सनी लिओन 98.5 गुणांसह अव्वल, मात्र...
phed.bih.nic.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत अव्वल आलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे सनी लिओन. ज्युनिअर सिव्हील इंजिनिअर या पदाच्या भरतीसाठी ती पात्र ठरली आहे.
![बिहारमधील भरती परीक्षेत सनी लिओन 98.5 गुणांसह अव्वल, मात्र... Sunny Leone Tops Bihar PHED Merit List for Civil Engineer Recruitment बिहारमधील भरती परीक्षेत सनी लिओन 98.5 गुणांसह अव्वल, मात्र...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/20161228/Sunny-Leone.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पाटणा : बिहारमध्ये सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षेत सनी लिओनने अव्वल क्रमांक मिळवला आहे. सनीला या परीक्षेत तब्बल 98.5 टक्के गुण मिळाले आहेत. पण ही सनी लिओन म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नाही, तर बिहारमधील एक विद्यार्थिनी आहे.
phed.bih.nic.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत अव्वल आलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे सनी लिओन. ज्युनिअर सिव्हील इंजिनिअर या पदाच्या भरतीसाठी ती पात्र ठरली आहे. संबंधित युवतीला पाच वर्षांचा कामाचा अनुभव आहे. ती लिओना लिओनची कन्या असल्याचं मेरीट लिस्टमध्ये म्हटलं आहे.
वेबसाईटवरील माहितीनुसार सनीने खुल्या प्रवर्गातून ही परीक्षा दिली. तिला या परीक्षेत 73.5 टक्के गुण मिळाले. आणि पूर्वीच्या कामाच्या अनुभवावरुन तिला अतिरिक्त 25 गुण देण्यात आले. त्यामुळे तिने थेट 98.5 गुण पटकावत परीक्षेत अव्वल येण्याचा मान मिळवला.
दरम्यान, हा कोणाचा तरी खोडसाळपणा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराचं नावही bvcxzbnnb अशाप्रकारे असंबद्ध दिसत आहे. त्यामुळे यामागे काय गौडबंगाल आहे, ही संबंधित सनी लिओन समोर आल्यानंतरच उलगडेल.
![बिहारमधील भरती परीक्षेत सनी लिओन 98.5 गुणांसह अव्वल, मात्र...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/21235142/Bihar-Sunny-Leone-PHED.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)