Sunny Leone : सनी लिओनीने पोलीस भरतीसाठी भरला फॉर्म? बोल्ड फोटो असलेलं प्रवेश पत्र व्हायरल
Sunny Leone : उत्तर प्रदेश पोलिसात भरती होण्यासाठी चक्क सनी लिओनीने फॉर्म भरल्याचं समोर आलं आहे.
Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सनीने पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्रीचा बोल्ड फोटो असलेलं प्रवेश पत्र व्हायरल झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
उत्तर प्रदेशातील पोलीस भरतीत सनी लिओनीचं नाव समोर आलं आहे.हे यूपी पोलीस भरती परीक्षेचं प्रवेश पत्र सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे. पोलीस भरतीच्या पहिल्या शिफ्टची परीक्षा शनिवारी पार पडली. यातील एक प्रवेश पत्र कन्नौज जिल्ह्याच्या केंद्रातून व्हायरल झालं आहे. यावर सनी लिओनीचा फोटो आणि नाव आहे. सनीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सनी लिओनीचे नाव आणि फोटो असलेले प्रवेश पत्र (ॲडमिट कार्ड) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या कार्डवर अभिनेत्रीचे दोन फोटोदेखील दिसत आहेत. ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचल्यावर सर्व जण गोंधळून गेले आहेत.
शरारती तत्वों के दिमाग़ की करतूत। पुलिस की भर्ती परीक्षा में कन्नौज के सेंटर पर सनी लियोन को दिखा दिया परीक्षार्थी। pic.twitter.com/yOuXn7VLjg
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) February 17, 2024
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रवेश पत्रानुसार, उमेदवाराला तिर्वा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षेला बसायचं होतं. ही उमेदवार होती सनी लिओनी. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही वेळातच अभिनेत्रीच्या नावाचे प्रवेशपत्र व्हायरल झाले. मात्र, हे प्रवेशपत्र खरे नसून कुणीतरी एडिट करून व्हायरल केल्याचंही म्हटलं जात आहे. हे बनावट प्रवेशपत्र आहे. काही उमेदवारांनी फॉर्म भरताना चुकीचा फोटो अपलोड केल्याचं सांगण्यात येत आहे. भरती मंडळाला ही माहिती मिळाल्यावर त्यांनी संबंधित उमेदवारांना सांगितलं की ज्यांचा फोटो चुकीचा छापला गेला असेल त्यांनी परीक्षा देण्यासाठी त्यांच्या ओळखपत्रासह केंद्रावर पोहोचावं.
सनी लिओनीचे प्रवेशपत्र व्हायरल झाल्याबद्दल एसपींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,"अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराने आपले नाव व फोटो अपलोड केलेला नाही. त्यामुळे हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे . संबंधित उमेदवारांना दुसरे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासंबंधात उत्तर प्रदेश रिक्रूटमेंट अँड प्रमोशन बोर्ड, लखनऊ यांना माहिती देण्यात आली आहे".
संबंधित बातम्या