![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Animal: 'अॅनिमल' मधील भावाचा 'तो' सीन पाहिल्यानंतर सीटवरुन उठून थिएटरच्या बाहेर गेला सनी देओल; नेमकं कारण काय?
Animal: एका मुलाखतीमध्ये बॉबीचा भाऊ सनी देओलनं अॅनिमल (Sunny Deol) चित्रपटामधील एका सीनबद्दल सांगितलं.
![Animal: 'अॅनिमल' मधील भावाचा 'तो' सीन पाहिल्यानंतर सीटवरुन उठून थिएटरच्या बाहेर गेला सनी देओल; नेमकं कारण काय? Sunny Deol Talk About Animal climax scene says he went out of his seat during bobby deol scene Animal: 'अॅनिमल' मधील भावाचा 'तो' सीन पाहिल्यानंतर सीटवरुन उठून थिएटरच्या बाहेर गेला सनी देओल; नेमकं कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/30/a19839564d8d80d6baf36f1dd177051b1703947555073259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Animal: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास एक महिना झाला आहे, मात्र अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाच्या (Sandeep Reddy Vanga) या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं आणि या चित्रपटातील अॅक्शन सीन्सचं अनेकांनी लक्ष वेधले. आता एका मुलाखतीमध्ये बॉबीचा भाऊ सनी देओलनं (Sunny Deol) अॅनिमल चित्रपटामधील एका सीनबद्दल सांगितलं.
'अॅनिमल' मधील हा सीन पाहिल्यानंतर सीटवरुन उठून थिएटरच्या बाहेर गेला सनी
अॅनिमल या चित्रपटातील रणबीर आणि बॉबीच्या फाइटचा क्लायमॅक्स सीन पाहिल्यानंतर सनी देओल हा सीटवरून उठला आणि सिनेमाबाहेर गेला होता. एका मुलाखतीदरम्यान सनी देओल म्हणाला की, "अॅनिमल हा एक उत्तम चित्रपट आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. पण जेव्हा मी चित्रपट पाहत होतो, तेव्हा क्लायमॅक्सच्या वेळी मी माझ्या सीटवरून उठलो आणि थिएटरच्या बाहेर गेलो. माझ्या भावाला मार खाताना मी पाहू शकत नाही. मी या सीनबद्दल अधिक बोलू शकत नाही."
बॉबी देओलने देखील एका मुलाखतींमध्ये अॅनिमल चित्रपटातील क्लायमॅक्सबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला होता की, "हा इमोशनल सीन शूट करताना त्याला त्याचा मोठा भाऊ सनी देओलची आठवण येत होती, त्यामुळे भावना अगदी खऱ्या वाटत होत्या."
View this post on Instagram
अॅनिमल या चित्रपटात बॉबी आणि रणबीर यांच्यासोबतच रश्मिका आणि अनिल कपूर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. अॅनिमल या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच अॅनिमल पार्क देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉबी देओलचे आगामी चित्रपट
अॅनिमल या चित्रपटानंतर बॉबी देओल हा रवींद्र बॉबी दिग्दर्शित 'एनबीके 109' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याचा कांगुवा हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे.सिरुथाई शिवा दिग्दर्शित कांगुवा या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. अभिनेता सूर्या या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. बॉबी देओलच्या आश्रम या वेब सीरिजच्या चौथा सीझनची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)