Sunny Deol Fees : 'Gadar 2'च्या यशानंतर सनी देओलची कोटीची उड्डाणे; एका सिनेमाचं मानधन वाचून व्हाल थक्क
Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.
![Sunny Deol Fees : 'Gadar 2'च्या यशानंतर सनी देओलची कोटीची उड्डाणे; एका सिनेमाचं मानधन वाचून व्हाल थक्क Sunny Deol Fees Gadar 2 Sunny Deol hikes fee after Gadar 2 success check other stars who followed the same route Bollywood entertainment movie Sunny Deol Fees : 'Gadar 2'च्या यशानंतर सनी देओलची कोटीची उड्डाणे; एका सिनेमाचं मानधन वाचून व्हाल थक्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/36109d0312de6a113e41b589bc9a78111693219258505254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunny Deol Film Fees : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) अभिनीत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'गदर'प्रमाणे 'गदर 2'देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. पण आता 'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलने आपल्या मानधनात वाढ केली असल्याचं म्हटलं जात आहे.
'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलच्या मानधनात वाढ (Sunny Deol Film Fees Details)
'गदर 2'चा यशाचा सनी देओलला चांगलाच फायदा झाला आहे. 'गदर 2'नंतर सनी देओल 'बॉर्डर 2','अपने 2','मां तुझे सलमान 2' सारख्या प्रोजेक्टचा भाग असणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण आता 'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलच्या मानधनात वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. सिनेविश्लेषक केआरे म्हणाला आहे,"एका निर्मात्यांनी आगामी सिनेमासाठी सनी देओलचा विचारले असता त्याने 50 कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली आहे".
'गदर 2'नंतर सनी देओल आता 'बॉर्डर' सिनेमामुळे चर्चेत आहे. 'बॉर्डर'चा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सनी देओलने मानधनात वाढ केली असल्याचं म्हटलं जात असलं तरी अभिनेत्याने अजून यासंदर्भात भाष्य केलेलं नाही.
बॉक्स ऑफिसवर 'गदर 2'चा बोलबाला (Sunny Deol Box Office Collection)
सनी देओल (Sunny Deol), अमीषा पटेल (Ameesha Patel) अभिनीत 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत 456.95 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 572.2 कोटींचा गल्ला जमवला आहे. उत्कर्ष शर्मा आणि मनीष वाधवा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमात तारा सिंहच्या मुलावर केंद्रित करण्यात आला आहे. 'गदर: एक प्रेम कथा' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील तारा सिंह आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता 22 वर्षांनंतरही त्यांची क्रेझ कायम आहे. या सिनेमाचा तिसरा भागदेखील येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या
Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' पाहायला गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच मृत्यू; व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)