VIDEO: राजकुमार कोहलींच्या शोकसभेत हसल्यानं सनी देओल ट्रोल; नेटकरी म्हणाले, "निर्लज्जपणा"
Sunny Deol: राजकुमार कोहली यांच्या शोकसभेतील सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी सनीला ट्रोल केलं आहे.
Sunny Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीचे (Armaan Kohli) वडील आणि चित्रपट निर्माता राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. राजकुमार कोहली यांनी शनिवार अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अभिनेता सनी देओल (Sunny Deol) देखीला या शोकसभेला उपस्थित होता. राजकुमार कोहली यांच्या शोकसभेतील सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी सनीला ट्रोल केलं आहे.
सनीचा व्हिडीओ व्हायरल
राजकुमार कोहली यांच्या प्रार्थना सभेत सनी देओलसोबतच विंदू दारा सिंह आणि इतर स्टार्स सहभागी झाले होते. या प्रार्थना सभेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये सनी देओल शोकसभेतून बाहेर पडताना हसताना दिसत आहे. शोकसभेत सनीचे असे हसणे नेटकऱ्यांना आवडले नाही. त्यामुळे आता नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सनीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "निर्लज्जपणा.. ज्या व्यक्तीचं निधन झालं आहे, त्या व्यक्तीच्या मुलासमोर असे हसणे चुकीचे आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "असं वाटतंय की त्यांची पार्टी सुरुये"
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फक्त सनीच नाही तर त्याच्या मागे उभे असलेले काही लोकही हसताना दिसत आहेत. यावरून यूजर्स त्यांना देखील ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
राजकुमार कोहली यांनी नागिन, जानी दुश्मन, बीवी नौकर का, बदले की आग, राज तिलक, जीने, नहीं दूंगा, इंतकाम, बीस साल बाद यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं. 'नागिन' आणि 'जानी दुश्मन' हे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले होते. राजकुमार कोहली यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली.
राजकुमार कोहली यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार कोहली 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते. पण उशिरापर्यंत ते बाहेर न आल्यानं तसेच त्यांचा काही आवाजही न आल्याने त्यांचा मुलगा अरमान कोहलीने दरवाजा तोडला आणि वडिलांना बाहेर काढलं. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या: