एक्स्प्लोर

Sunjay Kapur rescue Video Viral From London: संजय कपूर यांचे 'ते' शेवटचे क्षण, मैदानावर CPR देतानाचा VIDEO व्हायरल, मन हेलावणारी दृश्य

Sunjay Kapur rescue Video Viral From London: पोलो सामना सुरू असताना संजय कपूर यांनी चुकून मधमाशी गिळली, ज्यामुळे त्यांना क्षणार्धातच एलर्जिक रिएक्शन झालं. त्यातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.

Sunjay Kapur rescue Video Viral From London: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karisma Kapoor) घटस्फोटीत पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर (Sunjay Kapur) यांचं 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये निधन झालं. मिडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर पोलो खेळत असताना तोंडात मधमाशी जाऊन त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलो सामना सुरू असताना संजय कपूर यांनी चुकून मधमाशी गिळली, ज्यामुळे त्यांना क्षणार्धातच एलर्जिक रिएक्शन झालं. त्यातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. अशातच आता संजय कपूर यांच्या शेवटच्या काही क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संजय कपूर जमिनीवर कोसळलेले दिसतायत. आणि वैद्यकीय पथक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय.

व्हिडीओमध्ये सामन्यावेळी उपस्थित असलेले वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या छातीवर सीपीआर देत आहेत आणि त्यांना पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या शेवटच्या क्षणांचा असल्याचं सांगितलं जात आहे, जे पाहून लोक भावूक झाले आहेत.

संजय कपूर यांच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये काय दिसतंय? 

संजय कपूर यांचा मित्र आणि माजी भारतीय हॉकी संघाचे खेळाडू अजित नंदल यांनी 14 जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना अजित नंदल यांनी लिहिलंय की, "संजय कपूर यांचा शेवटचा रेस्क्यू व्हिडीओ… पोलोचा सामना सज्जन जैसल आणि संजयच्या संघात होता, सज्जन देखील तिथे उपस्थित होता.  घोड्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांसाठी हा अत्यंत दुःखद काळ आहे. देव आत्म्याला शांती देवो..." 

पोलो सामन्यादरम्यान गमावला जीव 

संजय कपूर ऑटो कंपोनंट कंपनी 'सोना कॉमस्टार'चे अध्यक्ष होते, जी विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणारं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ओळखली जाते. व्यावसायिक जगात त्यांची एक वेगळी ओळख होती. संजय कपूर यांना पोलो खेळण्याची खूप आवड होती आणि ते अनेकदा मैदानावर दिसायचे. 19 जून रोजी दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले, जिथे त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. 22 जून रोजी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये त्यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आलेली. यावेळी अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

FIR Against Vijay Deverakonda For His Controversial Remark: विजय देवरकोंडा अडचणीत? रश्मिकाच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवर आदिवासी समाजाची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप; नेमकं घडलं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget