एक्स्प्लोर

FIR Against Vijay Deverakonda For His Controversial Remark: विजय देवरकोंडा अडचणीत? रश्मिकाच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवर आदिवासी समाजाची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप; नेमकं घडलं काय?

FIR Against Vijay Deverakonda For His Controversial Remark: साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडावर आदिवासी समाजाची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

FIR Against Vijay Deverakonda For His Controversial Remark: साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (South Superstar Vijay Deverakonda) मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल (FIR Filed) करण्यात आला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडानं (Vijay Deverakonda) माला आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी (Comment On The Tribal Community) केली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणीअभिनेत्याविरुद्ध 17 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे प्रकरण 26 एप्रिल 2025 मधलं आहे. त्यानंतर अभिनेता सूर्याच्या 'रेट्रो' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजय देवरकोंडा यांनी हैदराबादमधील आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी केल्याचा आरोप आहे. यावर बराच गोंधळ उडाला आणि अभिनेत्यावर आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली.

विजय देवरकोंडाच्या वक्तव्यानंतर खळबळ 

विजय देवरकोंडानं कार्यक्रमात बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला की, "काश्मीरमध्ये जे काही घडतंय, त्यावर उपाय म्हणजे त्यांना (दहशतवाद्यांना) शिक्षित करणं. तसेच, आपण त्यांचं ब्रेनवॉशिंग होणार नाही, याची खात्री केली पाहिजे. ते काय साध्य करतील? काश्मीर भारताचं आहे आणि काश्मिरी आपले आहेत."

"ते असं वागतायत, जसं 500 वर्षांपूर्वी आदिवासी अजिबातच काही विचार न करता लढलेले..." 

अभिनेता पुढे म्हणाला की, "भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही, कारण पाकिस्तानी स्वतः त्यांच्या सरकारला कंटाळले आहेत आणि जर हे असंच चालू राहिलं, तर ते त्यांच्यावर हल्ला करतील. जसं 500 वर्षांपूर्वी विचार न करता लढलेल्या आदिवासींसारखे वागत आहेत. आजही लोक कसलाही मागचा पुढचा विचार न करता लढतायत." 

विजय देवरकोंडावर आदिवासींची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप

विजय देवेराकोंडाचं वक्तव्य आदिवासी नेत्यांना आवडलं नाही आणि त्यांनी अभिनेत्यावर आदिवासींची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप केला आहे. आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल एससी/एसटी कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आदिवासी समुदायांच्या संयुक्त कृती समितीचे राज्य अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार नाईक यांनी विजयविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

विजय देवरकोंडानं मागितलेली माफी, स्पष्टीकरणंही दिलेलं 

या प्रकरणात विजय देवेराकोंडानं 3 मे रोजी माफी मागितलेली आणि ट्विटरवर लिहिलेलं की, "माझ्या लक्षात आलंय की 'रेट्रो'च्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान मी केलेल्या वक्तव्यांमुळे काही लोक नाराज झाले आहेत. मी प्रामाणिकपणे स्पष्ट करू इच्छितो की, कोणत्याही समुदायाला, विशेषतः आपल्या अनुसूचित जमातींना, ज्यांचा मी खूप आदर करतो आणि आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो, दुखावण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता."    

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'मी श्रेयस अय्यरच्या मुलांची आई, माझं त्याच्याशी लग्न झालंय...'; 'गंदी बात' फेम अभिनेत्रीचा दावा, नेमकं काय म्हणाली?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
Embed widget