एक्स्प्लोर

Sukesh Chandrashekhar : 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह सुकेश चंद्रशेखरवर आरोप निश्चित; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय

Jacqueline Fernandez Case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने स्वतः न्यायालयासमोर हजर राहून आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. तिने खटला चालवण्याची मागणी केली आहे. 

Jacqueline Fernandez Case : दिल्लीतील प्रतिष्ठित पटियाला हाऊस न्यायालयानं 200 कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाइल खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बुधवारी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयानं बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar), त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सह-आरोपींविरुद्ध औपचारिकपणे आरोप निश्चित (Charges Framed) केले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (PMLA) आणि मकोका (MCOCA) कायद्यांतर्गत हे आरोप निश्चित केले असून, सर्व आरोपींना आता रीतसर खटल्याला (Trial) सामोरं जाण्याचे आदेश दिले आहेत.

या सुनावणीदरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने स्वतः न्यायालयासमोर हजर राहून आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. तिने खटला चालवण्याची मागणी केली असून, जॅकलिन ही केवळ ईडीच्या (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी आहे, मकोका प्रकरणात नाही. 

दुसरीकडे, सुकेश चंद्रशेखर याने ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आपले आरोप मान्य करत स्वाक्षरी केली, मात्र मकोका (MCOCA) प्रकरणात स्वाक्षरी करण्यास स्पष्ट नकार दिला. त्याची पत्नी लीना मारिया पॉल हिने मकोका प्रकरणातील आरोपांना तीव्र विरोध दर्शवत स्वाक्षरी केली. या हाय-प्रोफाइल प्रकरणात आता लवकरच न्यायालयाचा मुख्य ट्रायल सुरू होणार आहे.

Sukesh Chandrashekhar Stand : सुकेशचा मकोका स्वाक्षरीस नकार

सुकेश चंद्रशेखरचे वकील ॲडव्होकेट अनंत मलिक यांनी न्यायालयाबाहेरील घडामोडींची सविस्तर माहिती दिली. सुकेशने आधी पटियाला हाऊस न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये नुकताच अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी नवाज याचे आरोपपत्र (Charge Sheet) दाखल होईपर्यंत न्यायालयाने आपला आदेश सुनावू नये, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळल्यामुळे सुकेशने या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) आव्हान दिलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली ही याचिका सध्या प्रलंबित असून त्यावर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सुकेश चंद्रशेखरने पटियाला हाऊस न्यायालयाला सांगितलं की, जोपर्यंत उच्च न्यायालयाच्या याचिकेवर अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत तो मकोका प्रकरणातील आरोपांवर स्वाक्षरी करणार नाही. याच कारणामुळे त्याने केवळ अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) प्रकरणातील कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि मकोका प्रकरणावर स्वाक्षरी करणं टाळलं.

ED Delhi Police Investigation : 200 कोटींची खंडणी वसुलीचा आरोप

या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) या दोन्ही यंत्रणांनी अत्यंत सखोलपणे केला आहे. सुकेश चंद्रशेखरने उद्योगपती शिविंदर सिंग यांच्या पत्नी अदिती सिंग यांची फसवणूक करून त्यांच्याकडून तब्बल 200 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा मुख्य आरोप आहे. 

ईडीच्या आरोपानुसार, सुकेशने या खंडणीच्या पैशांचा वापर हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून केला. या गुन्ह्यातील पैशांमधून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक लाभ आणि अत्यंत महागडे गिफ्ट्स देण्यात आल्याचं तपासात समोर आलं होतं, ज्यामुळे ती या प्रकरणात अडकली आहे.

Aditi Singh Extortion Case : जुलै महिन्यात होणार पुढील सुनावणी

पटियाला हाऊस न्यायालयाने दोन्ही प्रकरणांच्या पुढील सुनावणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य सरकार आणि दिल्ली पोलिसांशी संबंधित असलेल्या 'मकोका' (MCOCA) प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी होणार आहे. तर, अंमलबजावणी संचालनालयाशी (ED) संबंधित असलेल्या 'मनी लॉन्ड्रिंग' (PMLA) प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जुलै रोजी केली जाईल. न्यायालयाच्या या महत्त्वाच्या पाऊलानंतर आता या प्रकरणाचे मुख्य ट्रायल वेगानं पुढं सरकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!
Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget