एक्स्प्लोर

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसचा आणखी पाय खोलात, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचण वाढणार

Jacqueline Fernandez: 200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोप निश्चित.

Jacqueline Fernandez Money Laundering: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालणार आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने 200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे.  न्यायालयानं सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल, अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिस आणि इतर आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. 

200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने या प्रकरणात घेतलेल्या निर्णयामुळे, जॅकलिन फर्नांडिसविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत नियमित खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात आता न्यायालयीन सुनावणी पुढील टप्प्यात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, न्यायालयानं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातही सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पॉल आणि इतर आरोपींविरोधात आरोप निश्चत केले आहेत.  दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींना  औपचारिक स्वाक्षरी करण्यासाठी 3 जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

जॅकलिनच्या अडचणीत वाढ

काही महिन्यांपूर्वी जॅकलिन फर्नांडिझने या प्रकरणात अर्ज दाखल करुन सुकेश चंद्रशेखरविरोधात माफीची साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास तसेच सत्य उघडकीस आणण्यास मदत करण्याची इच्छा तिनं व्यक्त केली होती. माफीच्या साक्षीदाराच्या दर्जा दिल्यास या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आणण्यास मदत करणार असल्याचंही अभिनेत्रीनं म्हटलं होतं.  तिच्या या निर्णयामुळे या प्रकरणात अनेक माहिती उघड होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने तिने दाखल केलेला अर्ज फेटाळला.

नेमकं प्रकरण काय?

अदिती सिंहच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केली होती. तपास यंत्रणांनुसार, कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरवर, कोट्यवधी रुपये उकळणे आणि त्या पैशांचा विविध मार्गांनी वापर केल्याचा आरोप आहे. ईडीचा आरोप आहे की, सुकेशकडून जॅकलिनला विविध महागडे भेटवस्तू मिळाले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने कायम हेच सांगितले की, तिला या कथित  गुन्हेगारीच्या संबंधित उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल माहिती नव्हते.

दरम्यान, या प्रकरणात आता जॅकलिनला 3 जून रोजी न्यायालयात हजर राहावे लागेल.  जॅकलीन आता हे प्रकरण कसे हाताळते? हे पाहणं महत्त्वाचे आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget