(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhir Mungantiwar : वाघनखं प्रकरणी नाना पाटेकरांनी केलेली टीका नव्हे ती त्यांची शैली; सुधीर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
Sudhir Mungantiwar On Nana Patekar : वाघनखं प्रकरणी नाना पाटेकरांनी पोस्ट शेअर केल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
Sudhir Mungantiwar On Nana Patekar Post : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची लंडनमध्ये असलेली वाघनखे (Wagh Nakh) लवकरच भारतात आणण्यात येणार आहेत. वाघनखं प्रकरणी नाना पाटेकरांनी (Nana Patekar) एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवारांना (Sudhir Mungantiwar) डिवलचं होतं. आता मुनगंटीवारांनी नानांनी केलेली टीका नव्हे ती त्यांची शैली, असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.
सुधीर मुनगंटीवार स्पष्टीकरण देत म्हणाले,"नाना पाटेकरांनी ट्वीट करण्याआधी मला फोन केला होता. अभिनंदन केलं. तसेच ते पुढे म्हणाले, सुधीर मला मनापासून खूप आनंद होत आहे. तुझं खूप कौतुक. त्यामुळे नाना पाटेकरांनी टीका केलेली नाही. त्यांची एक भाषाशैली आहे. त्यांच्या त्या शैलीत ते म्हणाले,"वाघनखे तर येत आहेत...पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतला जो देश आहे त्यासाठी सरकारने काम करावं". त्यावर मी त्यांना म्हणालो,"मोदी ED च्या चौकश्या करत आहेत..त्या भ्रष्टाचाराचा कोथळा काढण्याचाच भाग आहे".
नाना पाटेकर काय म्हणाले होते? (Nana Patekar Post)
नाना पाटेकर पोस्ट शेअर करत म्हणाले होते,"मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत..त्याबद्दल अभिनंदन...जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा.". नानांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. नानांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा बाहेर काढणारी शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार असल्याचं ते म्हणाले. शिवरायांची ही वाघनखे अनमोल ठेवा असून ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya) ठेवण्यात येणार आहेत.
#छत्रपति_शिवाजी_महाराज द्वारा अफजल खान को मारने के लिए उपयोग किए गए बाघनख को भारत वापस लाने के लिए ब्रिटिश प्रशासन के साथ एक समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए जाएंगे। यह हर भारतीय के लिए गर्व का क्षण है।@PMOIndia#WaghNakh #ReturnOfTigerClaw
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 9, 2023
संंबंधित बातम्या