एक्स्प्लोर
VIDEO : 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर'चा टीझर लाँच
प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे.

मुंबई : मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर रीलिज झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. कोण कोणत्या भूमिकेत डॉ. काशिनाथ घाणेकर - सुबोध भावे मास्टर दत्ताराम - सुहास पळशीकर वसंत कानेटकर - आनंद इंगळे सुलोचना दीदी - सोनाली कुलकर्णी डॉ. श्रीराम लागू - सुमित राघवन भालजी पेंढारकर - मोहन जोशी प्रभाकर पणशीकर - प्रसाद ओक अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट येत्या दिवाळीत म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा























