Subhedar : अजय देवगणच्या 'तान्हाजी'वर भारी पडलाय मराठमोळा 'सुभेदार'; जाणून घ्या IMDB रेटिंग अन् कमाईबद्दल...
Subhedar : 'सुभेदार' या ऐतिहासिक सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.
Subhedar Marathi Movie IMDB Rating And Box Office Collection : 'सुभेदार' (Subhedar) या ऐतिहासिक सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'तान्हाजी'वर (Tanhaji) हा मराठमोळा सिनेमा भारी पडला आहे.
'सुभेदार'ची कमाई जाणून घ्या... (Subhedar Box Office Collection)
'सुभेदार' हा सिनेमा 25 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.5 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 1.69 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांत या सिनेमाने 2.74 कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला हा सिनेमा पाहायला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक जात आहेत. त्यामुळे वीकेंडला हा सिनेमा चार कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अजय देवगणच्या 'तान्हाजी'वर भारी पडलाय मराठमोळा 'सुभेदार' (Tanhaji Subhedar IMDB Rating)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'तान्हाजी' (Tanhaji) हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ओम राऊतने (Om Raut) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. अजय देवगण आणि काजोल (Kajol) या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. जगभरात या सिनेमाने चांगलीच कमाई केली. पण आयएमडीबीवर (IMDB) या सिनेमाला 7.5 रेटिंग मिळाले. तर आता 'सुभेदार' या मराठमोळ्या सिनेमाला मात्र IMDB वर 9.7 रेटिंग मिळाले आहे.
शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असलेल्या सुभेदार तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा 'सुभेदार... गड आला पण...' हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. चहूबाजूंनी या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रेक्षकही प्रचंड उत्साहात 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत 'सुभेदार... गड आला पण...' पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
'सुभेदार' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. या सिनेमाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून सुभेदार मालुसरेंच्या भावनिक रूपाचं यथार्थ दर्शन घडवणारा आहे.
सुभेदारांचे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आऊसाहेब, पत्नी, मुलगा, भाऊ, मामा यांच्याशी असलेलं नातं अधोरेखित करणारा आहे. त्या संदर्भातील अत्यंत भावनिक करणारे प्रसंग या सिनेमात अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहेत. त्या काळातील आजूबाजूची सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग 'सुभेदार'मध्ये आहेत.
संबंधित बातम्या