Subhedar : "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं"; तानाजी मालुसरेंच्या 'सुभेदार' सिनेमाचा टीझर रिलीज
Subhedar : 'सुभेदार' या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Subhedar Teaser Out : 'सुभेदार' (Subhedar) या ऐतिहासिक सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांच्या शौर्याची झलक पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणत अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांच्या नावाशिवाय शिवचरित्र अपूर्ण आहे. त्यांनी फक्त सिंहगडाची लढाई केली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य पायाभरणी करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पैलूंवर प्रकाश टाकणारा सुभेदार हा ऐतिहासिक भव्य सिनेमा असेल, याचा ट्रेलरवरुन अंदाज येत आहे.
दिग्पाल लांजेकरने शेअर केला टीझर (Digpal Lanjekar Shared Subhedar Teaser)
'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj) अशा अनेक सुपरहिट सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आता सुभेदार या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पालने या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प 'सुभेदार'... 25 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा..".
View this post on Instagram
दिग्पालने शेअर केलेल्या टीझरवर आता खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या इतिहासाला योग्य तो न्याय मिळेल आणि लोकांपर्यंत खरा इतिहास पोहचेल, शिवरायांचा इतिहास असाच सर्वांसमोर यावा, जय शिवराय, हर हर महादेव, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच दिग्पालला त्याच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत.
'सुभेदार' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Subhedar Released Date)
'सुभेदार' या सिनेमात प्रेक्षकांना तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'पहिला मानाचा मुजरा', असं म्हणत टीझर आऊट करण्यात आला आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरने सांभाळली आहे. हा सिनेमा 25 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी ओम राऊतचा 'तान्हाजी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
संबंधित बातम्या