एक्स्प्लोर
'रईस'च्या प्रमोशनसाठी शाहरुख खान रेल्वेने प्रवास करणार!
मुंबई: किंग खान शाहरुख त्याच्या आगामी सिनेमा 'रईस'साठी हटके प्रमोशनच्या तयारीत आहे. रईसच्या प्रमोशनसाठी शाहरूख खान दिल्लीला फ्लाईटनं नाही, तर रेल्वेनं जाणार आहे. यावेळी रईस सिनेमाची संपूर्ण टीम मुंबई ते दिल्ली रेल्वेनं प्रवास करणार आहे.
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्यासाठी किंग खाननं सिनेमाचं प्रमोशन रेल्वेनं करण्याचं ठरवलं. त्यामुळे सोमवारी अगस्त क्रांती ट्रेननं रईसची टीम दिल्लीला रेल्वेनं रवाना होणार आहे. चित्रपट निर्माते रितेश सिधवानी आणि सिनेमा दिग्दर्शक राहुल ढोलकीया हेदेखील शाहरुख सोबत प्रवास करणार आहेत.
विशेष म्हणजे, शाहरुख खान बॉलिवूड इंडस्ट्रित 25 वर्ष पूर्ण करत असून, त्याच्यासाठी हा प्रवास अविस्मरणीय ठरणार आहे. कारण त्याने मुंबईपर्यंतचा प्रवास हा ट्रेननेच केलेला असल्याने, त्याला या प्रवासात आठवणींना उजाळा मिळेल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement