Happy Birthday Jyothika : बॉलिवूडमधून सुरुवात पण साऊथ इंडस्ट्रीमध्ये मिळालं स्टारडम, पहिल्याच चित्रपटातील अभिनेत्यावर जडलं प्रेम; 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
Jyothika And Suriya Love Story : अभिनेत्री ज्योतिका पहिल्याच चित्रपटातील तिच्या को-स्टारच्या प्रेमात आकंठ बुडाली. प्रपोज करताच दोघांनी लग्नही उरकलं.
Actress Jyothika Birthday Special : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री ज्योतिका तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ज्योतिकाच्या सौंदर्यासह तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. ज्योतिकाचा आज 18 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. ज्योतिका ही साऊथ सिनेमातील प्रसिद्ध हिरोईनपैकी एक आहे. आज तिचा 46 वा वाढदिवस करत आहे. ज्योतिकाचा जन्म 18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत झाला. तिने कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. चित्रपटांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. अभिनेत्री ज्योतिकाच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घ्या.
बॉलिवूडमधून सुरुवात पण साऊथ इंडस्ट्रीमध्ये मिळालं स्टारडम
अभिनेत्री ज्योतिका दाक्षिणात्या इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे, पण, खूप कमी जणांना माहित असेल की, तिने अभिनयाची सुरुवात बॉलिवूडपासून केली होती. मुंबईत जन्मलेली ज्योतिक साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कशी बनली हे जाणून घ्या. ज्योतिकाला बॉलिवूडमध्ये काही खास प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर तिने साऊथमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि यश मिळवलं. पहिल्याच चित्रपटातील को-स्टारवर तिचं प्रेम जडलं यानंतर त्यांनी लग्नही केलं.
पहिल्याच चित्रपटातील अभिनेत्यावर जडलं प्रेम
ज्योतिका आणि सूर्या यांच लव्ह मॅरेज झालं आहे. 1999 मध्ये आलेल्या 'पूवेल्लम केत्तुप्पर' (Poovellam Kettuppar)चित्रपटामध्ये अभिनेत्री ज्योतिका आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांनी एकत्र काम केलं. चित्रपटाच्या सेटवर दोघांचं प्रेम जडलं. यांच्या अफेअरच्या बातम्याही बराच काळ चर्चेत होत्या. सूर्याने ज्योतिकाला चित्रपटाच्या सेटवरच प्रपोज केलं, यानंतर दोघे गुपचूप जाऊन मंदिरात लग्न करुन आले. ज्योतिका आणि सूर्याने 2006 मध्ये लग्न केलं. या जोडप्याला एख मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले आहेत.
जोडीदार म्हणून सूर्याची निवड का केली?
सूर्यासोबत लग्न का केलं, या प्रश्नाचं उत्तर देताना ज्योतिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "सूर्याच्या स्वभाव मला फार आवडला, त्याच्या स्वभावाकडे मी आकर्षित झाले. मी स्वतःसाठी सूर्याचीच निवड करण्याचं कारण म्हणजे त्याने मला दिलेला आदर होता. पहिल्याच भेटीत तो माझ्याशी अगदी सहजपणे बोलला, जे मला खूप आवडले. त्यानंतर आम्ही दोघांनी सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. तो फक्त माझाच नाहीतर इतर स्त्रियांचाही आदर करायचा, हेच माझ्या मनाला भावलं".
20 वर्षांच्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम
ज्योतिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'वाली' या चित्रपटातून केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, तिने 20 वर्षांच्या कारकिर्दीत 42 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री ज्योतिकाने 1998 मध्ये इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. 'डोली सजा के रखना' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी 'मुगावरी', 'कुशी', 'रिदम', 'तेनाली' या तमिळ चित्रपटांमध्ये काम केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :