एक्स्प्लोर

सिनेमा रिव्ह्यू : भय

भय इथले संपत नाही

राहुल भातणकर हा मूळचा संकलक. अनेक वर्षं संकलन करताना आलेला अनुभव गाठीशी घेऊन त्याने आता दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. त्याचा हा दुसरा चित्रपट. यापूर्वी याचा टाईम बरा वाईट हा चित्रपट येऊन गेला. आता भय या चित्रपटाद्वारे तो रसिकांसमोर येतो आहे. अभिजीत खांडकेकर, विनित शर्मा, संस्कृती बालगुडे, स्मिता गोंडकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मानसिक आजारावर बोलतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मानवी मनावर कळत नकळत कसा परिणाम होतो हे दाखवण्याचा या दिग्दर्शकाचा हा प्रयत्न आहे. प्रयत्न म्हणून त्याची दखल घ्यायला हवी. पण चित्रपट म्हणून यात अनेक गोष्टींची कमतरता जाणवते. विषय चांगला असला, तरी तो मांडताना त्याचा पसारा नेटका न झाल्यामुळे हा चित्रपट केवळ सरधोपट गोष्टींवर बोलतो आणि पुढे जातो. चित्रपट वेगवान झाला असला, तरी तो भिडत नाही. चित्रपटाच्या नायकाला वेगवेगळी स्वप्नं पडतात. कुणीतरी त्याला ढकलतं.. तो ट्रेनखाली आला आहे, कोणीतरी त्याचा गळा आवळतं आहे. कुठेतरी फायरिंग झालं आहे अशा पद्धतीची ही सगळी स्वप्नं. त्यामुळे तो आधीच असुरक्षित बनला आहे. त्याची पत्नी त्याच्यावर कमालीची प्रेम करते. नायकाच्या अनपेक्षित वर्तनाचा तिलाही त्रास होतोय. पण तो असं का वागतो त्याचं कारण तिला कळत नाही. सततच्या स्वप्नांनी तो भयभीत झाला आहे. त्या भीतीपोटीचं त्याच्या व्यक्तिमत्वात बदल घडू लागला आहे. हे भय त्याला कोणत्या थराला नेतं त्याची ही गोष्ट आहे. नायकाच्या भूमिकेत अभिजीत खांडकेकर असून, त्याच्या पत्नीच्या भूमिकेत स्मिता गोंडकर आहे. या चित्रपटाच्या गाण्याचं चित्रिकरण दुबईत झाल्यामुळे सिनेमाला एक वेगळा लूक मिळतो. अभिजीत खांडकेकरने भयग्रस्त झालेला नायक नेटका रंगवला असला, तरी चित्रपटाच्या लेखनात आणखी सुधारणा आवश्यक होत्या असं वाटतं. लेखनातल्या त्रुटीमुळे हा चित्रपट थेट भिडत नाही. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, संस्कृती  बालगुडे यांच्याही भूमिका आहेत. पण त्याच्या भूमिकेला मर्यादा असल्याचं जाणवतं. भय बनवण्यामागची भूमिका प्रामाणिक असली तरी चित्रपटासाठी आवश्यक असलेली पटकथा, संवाद यांचा अभाव चित्रपटात दिसतो. नायकाला मानसिक आजार आहे हे कळल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याचा पत्नीचा अॅप्रोच बदललेला दिसत नाही, त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतात. या चित्रपटात आलेला इन्स्पेक्टरचा ट्रॅकही बराच लांबल्याने मूळ गोष्टीपासून हा  चित्रपट फारकत घेतो. याची गाणी चाल म्हणून ठीक असली तरी त्या गीतांचं उच्चारण बेफिकिरीने झाल्याचं जाणवतं. अमराठी गायकाने हे गायन केल्याचा फटका गाण्यांना बसला आहे. असो. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळतो ओकेओके स्मायली.

महत्त्वाच्या बातम्या

Famous Youtuber Found Dead In Georgia: ट्रॅव्हल व्लॉगसाठी जॉर्जियाला गेला अन् कुटुंबीयांशी संपर्क तुटला; प्रसिद्ध युट्यूबरचं निधन, फॉलोअर्स हादरले
ट्रॅव्हल व्लॉगसाठी जॉर्जियाला गेला अन् कुटुंबीयांशी संपर्क तुटला; प्रसिद्ध युट्यूबरचं निधन, फॉलोअर्स हादरले
Ramayan Part 1 Ranbir Kapoor: 'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
Medha Manjrekar cancer: 'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
Embed widget