एक्स्प्लोर
पुढच्या वर्षी अभिनेत्री सोनम कपूरचं शुभमंगल?
मुंबई : 2016 हे वर्ष अभिनेत्री सोनम कंपूरसाठी जोरदार ठरलं. वर्षाच्या सुरुवातीलाच 'नीरजा' सारखा हिट चित्रपट, प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुकाची थाप तिला मिळाली. मात्र पुढचं वर्ष तिच्या वैयक्तिक आयुष्यात खास ठरणार आहे. कारण सोनम विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.
आनंद अहुजा आणि सोनम कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा आहे. सोनम आणि आनंद 2017 मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार दोघं गेलं वर्षभर डेटिंग करत आहेत. अनेक पार्ट्यांनाही दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे.
'आनंद्ज अॅपरल्स' ब्रँडचे कपडे सोनम परिधान करताना आणि त्याचं प्रमोशन करताना वारंवार दिसते. मात्र त्याविषयी छेडलं असता सोनमने आपल्या खाजगी जीवनावर बोलण्यास साफ नकार दिला.
चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्या एका शोमध्ये सोनमने 'बालपणी आपला विनयभंग झाला होता' असा गौप्यस्फोट केला. ही घटना सांगताना तिला अश्रू अनावर झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement